Marathwada Politics News Sarkarnama
मराठवाडा

Third Front Political News : `तिसरी आघाडी`च्या मेळाव्यात `भावी मुख्यमंत्री संभाजीराजें` च्या घोषणा ; राजे संतापले

Heralded by supporters as the future Chief Minister, Sambhaji Raje was enraged : माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी कसे होईल ? काय होईल ? हे म्हणण्यापेक्षा परिवर्तन महाशक्तीत सामिल व्हा. तिकडे त्यांचेही नीट चालू नाही. आठ दिवसात लाथा बुक्क्या सुरू होतील.

Jagdish Pansare

Marathwada Politics News : राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या विरोधात सक्षम पर्याय म्हणून `तिसरी आघाडी` समोर येऊ पाहत आहे. या आघाडीचा परिवर्तन महाशक्ती संयुक्त मेळावा आज मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरात पार पडला. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्यात संभाजीराजे छत्रपती यांच्या नावाने भावी मुख्यमंत्री कैसा हो, संभाजीराजे जैसा हो, अशा घोषणा देण्यात आल्या.

या घोषणा ऐकून संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) चांगलेच संतापले. त्यांनी समर्थकांना खडसावत अशा कुठल्याही घोषणा देऊ नका, असे सांगत फक्त तिसऱ्या आघाडीच्या समर्थनात घोषणा द्या, असे बजावले. संभाजीराजे संतापल्यामुळे सभागृहातील वातावरण काही काळ गंभीर बनले होते. तिसऱ्या आघाडीच्या सगळ्याच नेत्यांनी महायुती-महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात व मराठवाड्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. तर सत्ताधारी महायुतीला मतदारांनी दणका दिला. मात्र महायुती आणि महाविकास आघाडी दोघे एकाच माळेचे मणी आहेत, म्हणत राज्यात तिसऱ्या आघाडीचा घाट संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी या त्रिकुटाने घातला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 18 मागण्याचा प्रस्ताव आणि त्यावर निर्णय घेण्यासाठी 25 सप्टेंबर पर्यंत दिलेली डेडलाईन संपल्यानंतर आज तिसऱ्या आघाडीचा संयुक्त मेळावा संभाजीनगरमध्ये घेण्यात आला.

महायुती-महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असताना तिसऱ्या आघाडीच्या पहिल्याच मेळाव्यात मुख्यमंत्री पदासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या नावाने घोषणा देण्यात आल्याने वातावरण काहीसे तापले. (Marathwada) स्वत: संभाजीराजे यांना या घोषणा आवडल्या नाही. समर्थकांना खडेबोल सुनावत त्यांनी घोषणा बंद करायला लावल्या. अशा कुठल्याही घोषणा यापुढे देवू नका. आता फक्त परिवर्तन महाशक्ती आहे, त्याच घोषणा द्या असे त्यांनी कार्यकर्त्यांना ठणकावले.

परिवर्तन महाशक्तीच्या कुठल्याही मेळाव्यात सत्कार होणार नाही. केवळ दिपप्रज्वलन आणि राष्ट्रध्वजाला नमन करून एक पुष्पहार व्यासपीठाला अर्पण करण्यात येईल, असे यावेळी आयोजकांनी स्पष्ट केले. दरम्यान, माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी कसे होईल ? काय होईल ? हे म्हणण्यापेक्षा परिवर्तन महाशक्तीत सामिल व्हा. तिकडे त्यांचेही नीट चालू नाही. आठ दिवसात लाथा बुक्क्या सुरू होतील. इच्छुकच पाडवणूक करणारे असतील. पाच सदस्यांची सुकाणू समिती पुढील परिवर्तन महाशक्तीचे धोरण ठरवेल.

चांगला पर्याय आपण देतोय, ही परिवर्तन महाशक्ती शिक्षण, शेती, सिंचन विकास आणि सामाजिक न्यायाचे सरकार देईल. दरवर्षी 6 लाख कोटी म्हणजे पाच वर्षात 30 लाख कोटींचे बजेट असणारे सरकार उर्जा क्षेत्रात परिपुर्ण होऊ शकत नाही. गेल्या चार पाच वर्षातील सरकारांससोर गोल नाही. सामाजिक प्रश्‍नांबाबत अनास्था आहे. समृद्ध महाराष्ट्राला आत्महत्येचे राज्य म्हटल्या जातेय म्हणून ही एकजुट आहे, असे धोंडगे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT