Mla Meghna Bordikar News Sarkarnama
मराठवाडा

Meghna Bordikar : पालकमंत्री मेघना बोर्डीकरांनी जिंतूर सोडलेच नाही! मतदारांमधील उत्साह कोणाच्या कपाळी गुलाल लावणार?

Local Body Election : जिंतूर नगरपालिकेच्या निवडणुकीत काही केंद्रावर किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. यावेळी परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर तळठोकून होत्या.

Jagdish Pansare

  1. जिंतूर नगरपालिकेवर ताबा मिळवणे हे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासाठी प्रतिष्ठेचे आणि आव्हानात्मक ठरले आहे.

  2. दगाफटका टाळण्यासाठी आणि पक्षसंघटन मजबूत ठेवण्यासाठी त्यांनी दिवसभर जिंतूरमध्येच मुक्काम केला.

  3. किरकोळ गैरप्रकार असूनही तब्बल 75% मतदान झाल्याने स्पर्धा अत्यंत तगडी होणार असून निकालासाठी 20 दिवसांची प्रतीक्षा आहे.

Jintur News : परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासमोर जिंतूर नगरपालिका ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान या निवडणुकीत आहे. विरोधकांना धूळ चारण्यासाठी मेघना बोर्डीकर यांनी तडजोडीही स्वीकारल्या. जिंतूरमध्ये कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून त्यांनी आज जिंतूर सोडलेच नाही. किरकोळ गैरप्रकारानंतरही नगरपालिकेसाठी 75 टक्के मतदान झाले. मतदारांचा उत्साह आता कोणाच्या कपाळी गुलाल लावणार? यासाठी वीस दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

जिंतूर नगरपालिकेच्या निवडणुकीत काही केंद्रावर किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. सायंकाळी साडेपाचनंतरही काही मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा होत्या. तर सायंकाळी साडेसहानंतरही मतदान प्रक्रिया काही केंद्रावर सुरु होती. शेवटी 75 टक्के पेक्षा जास्त मतदान होण्याचा अंदाज आहे. पालिकेच्या निवडणुकीत 12 प्रभागांत 44 केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली.

सकाळी साडेसात वाजेपासून मतदारांच्या केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पहिल्या दोन तासांतच 13.1 तर साडेअकरापर्यंत 27.8 टक्के मतदानाची नोंद झाली. त्यानंतर मतदारांचा ओघ वाढत गेला. दुपारी दीड 42.9 साडेतीन वाजेपर्यंत 58.2 टक्के मतदान झाले होते. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यात दोन पक्षांत चुरशीची लढत झाली. प्रभाग क्रमांक 10 मध्ये माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे तर प्रभाग क्रमांक ६ मध्ये माजी आमदार विजय भांबळे यांचे पुतणे पृथ्वीराज भांबळे उभे होते.

या प्रभागात चुरशीची लढत होत असल्याने प्रशासनातर्फे हे मतदान केंद्र अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले होते. दुपारी दोन वाजेनंतर प्रभाग क्रमांक 11 मध्ये बोगस मतदान होत असल्याच्या संशयावरून राष्ट्रवादी व भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने मोठा तणाव निर्माण झाला. यात एका ज्येष्ठ नागरिकांला मारहाण करण्यात आली. परंतु पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला. या तीन प्रभागात दिवसभर तणाव होता.

पालकमंत्र्यांसह पदाधिकारी ठाण मांडून

पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर बोर्डीकर हे दिवसभर वेगवेगळ्या मतदान केंद्रावर ठाण मांडून होते. तर माजी आमदार विजयराव भांबळे, प्रमोद भांबळे, बाळासाहेब भांबळे यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही मतदान केंद्रावर ठाण मांडून होते. शहरातील डॉ. सुभाषचंद्र राठी बालक विद्यामंदिर शाळेतील केंद्रावर राष्ट्रवादी व भाजपाच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

मुस्लिम बहुल केंद्रावर रांगा

शहरात मुस्लिम मतदारांची संख्या जवळपास तेवीस हजारापेक्षा जास्त आहे. मुस्लिम बहुल मतदान केंद्रावर सकाळी साडेसात वाजेपासूनच महिलांनीही रांगा लावल्या. यात वृद्ध, दिव्यांग यासारख्या मतदारांची संख्याही लक्षनीय होती.

FAQs :

1. जिंतूर नगरपालिकेतील मतदान किती झाले?
जिंतूरमध्ये एकूण सुमारे 75% मतदान झाले.

2. मेघना बोर्डीकर जिंतूरमध्ये दिवसभर का थांबल्या?
दगाफटका टाळण्यासाठी आणि उमेदवार व कार्यकर्त्यांच्या समन्वयासाठी त्या जिंतूरमध्येच थांबल्या.

3. ही निवडणूक त्यांच्यासाठी महत्वाची का आहे?
जिंतूर नगरपालिकेवर ताबा मिळवणे हे त्यांचे राजकीय वजन टिकवण्यासाठी प्रतिष्ठेचे मानले जाते.

4. तडजोडी का करण्यात आल्या?
विरोधकांना रोखण्यासाठी आणि अंतर्गत मतभेद टाळण्यासाठी काही तडजोडी स्वीकारल्या गेल्या.

5. निकाल कधी लागणार?
सुमारे वीस दिवसांनंतर मतदानाचे निकाल जाहीर होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT