Kalamnuri Shivsena corporator firing case sarkarnama
मराठवाडा

Hingoli Crime : जुन्या वादातून अंदाधूंद गोळीबार, एकाचा मृत्यू ; शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकासह सोळा जणांवर गुन्हा दाखल

Shivsena Corporator firing case : हिंगोलीत धक्कादाय घटना घडली असून शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकानेच गोळीबार केल्याचे समोर आले आहेत.

Jagdish Pansare

Marathwada News : कळमनुरी शहरात काल मध्यरात्री झालेल्या जुन्या वादातील भांडणातून एका गटाने दुसऱ्या गटावर अंदाधुंद गोळीबार केला. यात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू झाल्याची थरारक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकूण 16 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एक आरोपी हा शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक असून दुसरा आरोपी शिवसेनेच्या महिला नगर सेविकेचा पती आहे. तर दुसरा संशयित आरोपी हा शिवसेनेच्या महिला नगर सेविकेचा दीर असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे एकाच खळबळ उडाली असून जुन्या वादाचे रक्तरंजित हिंसेत रूपांतर झाल्याचे समोर आले आहे.

ही थरारक घटना रात्री अकराच्या सुमारास जुन्या बसस्थानक परिसरात घडली. शिवसेना नगरसेवक किशोर भालेराव याने गावठी कट्ट्यातून केलेल्या अंदाधुंद गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सात जणांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील इंदिरानगर व जुने बसस्थानक भागातील युवकांच्या दोन गटांत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. बुधवारी रात्री दोन्ही गट समोरासमोर आले आणि वाद विकोपाला गेला. यावेळी शिवसेना नगरसेवक किशोर भालेराव याने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला.

यामध्ये लुकमान सिद्दिकी (वय 38) हा जागीच ठार झाला, तर ओसामा सिद्दिकी (25), शारिया सिद्दिकी (22), इम्रान पठाण (16) व मेहराज पठाण (20) हे चार जण गंभीर जखमी झाले. या गोळीबारानंतर तातडीने जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे.

दरम्यान या प्रकरणात शिवसेना नगरसेवक किशोर भालेराव याच्यासह शिवसेनेच्या महिला नगरसेविकेचा पती फयुम नाईक आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला नगर सेविकेचा दीर शेख शकील शेख खलील अशांचा समावेश असल्याची माहिती आहे. हल्लेखोर हे मोटारसायकल आणि काळ्या रंगाच्या स्कार्पिओमधून आले होते.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी कुंदन कुमार वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, जमीर नाईक यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा व अपर पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी इम्रान पठाण याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून, फरार नऊ आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथके रवाना केली आहेत. शहरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गावठी कट्ट्यांचे नेटवर्क शोधण्याचे आव्हान

या टोळीयुद्धात गावठी कट्ट्याचा वापर झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. हे प्राणघातक कट्टे शहरात आले कुठून, त्यामागे कोणाचे रॅकेट कार्यरत आहे आणि अजून किती जणांकडे अशी बेकायदेशीर शस्त्रे आहेत? याचा सखोल तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT