Pradnya Satav News, Hingoli Sarkarnama
मराठवाडा

Congress News : अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले, तरी हिंगोलीची जागा काँग्रेसलाच मिळणार

Pradnya Satav Claims Hingoli Lok Sabha Constituency : हिंगोलीवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच...

Prasad Shivaji Joshi

Hingoli Politics News :

अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी सामान्य कार्यकर्ते पक्षासोबतच आहेत, असा विश्वास कॉंग्रेस पक्षाच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी व्यक्त केला. तसेच हिंगोली लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेस पक्षालाच मिळेल, असा दावाही केला. Congress पक्षाचे मराठवाड्यातील मातब्बर नेते अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे येत्या काळात मराठवाड्यात अनेक ठिकाणी पक्षाला धक्का बसेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विशेषत: नांदेड व शेजारील हिंगोली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षातील अनेक नेते चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करतील, असा अंदाज आहे. मात्र पक्षाच्या आमदार Pradnya Satav यांनी यासंदर्भात `सरकारनामा`शी बोलताना स्पष्ट केले की, हिंगोली जिल्ह्यात याचा फारसा परिणाम होणार नाही. कारण कार्यकर्ते अजूनही पक्षासोबत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीमध्ये असताना अशोक चव्हाण यांनी सुरुवातीपासून हिंगोली मतदारसंघासाठी आग्रह धरला होता. शिवसेना ठाकरे गटाकडून हा मतदारसंघ काँग्रेला आणि त्याबदल्यात लोकसभेचा जालना मतदारसंघ ठाकरेंना देण्याचा निर्णय अंतिम टप्यात असताना अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले. मात्र, काँग्रेसचा या जागेवरचा दावा अद्यापही कायम असल्याचे सातव यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले.

अशोक चव्हाण यांचे दिल्ली दरबारी जे स्थान होते तसेच स्थान दिवंगत नेते Rajiv Satav यांनी निर्माण केले होते. पक्षाचे युवा नेते राहुल गांधी यांच्या प्रमुख सल्लागारांमध्ये राजीव सातव यांचा समावेश होता. 2014 मध्ये देशात नरेंद्र मोदी लाट असताना राज्यात कॉंग्रेस पक्षाचे केवळ दोनच खासदार निवडून आले होते. त्यामध्ये नांदेड येथील अशोक चव्हाण आणि हिंगोली येथील राजीव सातव यांचा समावेश होता. त्यामुळे राजीव सातव यांचे राष्ट्रीय पातळीवर स्थान बळकट झाले होते.

तसेच राज्यातील राजकारणातही अशोक चव्हाण यांच्या समांतर राजीव सातव यांच्या शब्दाला वजन होते. राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारसदार म्हणून प्रज्ञा सातव या सक्रिय झाल्या. पक्षाने त्यांना विधान परिषद सदस्यत्व बहाल केले. नुकताच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे एका अर्थाने कॉंग्रेस पक्षात राष्ट्रीय पातळीवर थेट संपर्क असलेल्या नेत्या म्हणून प्रज्ञा सातव यांचे पक्षातील स्थान अधिक बळकट झाले आहे. तसेच त्यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारीही केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीच्या जागावाटपात हिंगोली लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसलाच मिळेल, असा दावाही त्यांनी केला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षातर्फे सुभाष वानखेडे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र शिवसेनेच्या हेमंत पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. मुळचे शिवसैनिक असलेल्या सुभाष वानखेडे यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली. त्यामुळे वानखेडे यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेत शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाने हिंगोली लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. तर हिंगोली लोकसभा मतदारसंघातील भौगोलिक स्थिती, जातीय समीकरणे व पक्षाची परंपरागत वोटबँक असलेल्या दलित, मुस्लीम मतदारांचे प्राबल्य बघता कॉंग्रेस हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT