Shivsena UBT News : ठाकरे सैनिक म्हणतायेत, भेटी लागी जीवा लागलीसे आस

Dharashiv Political News : उद्धव ठाकरेंचा दौरा रद्द झाल्याने धाराशिवचे सैनिक प्रतीक्षेत 
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच धाराशिव दौऱ्यावर येणार होते. महाविका आघाडीची सत्ता गेली, ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेले अन् पक्षही फुटला. अशा संकटातही धाराशिव जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि शिवसैनिक एकनिष्ठ राहिले. सत्ताधारी शक्तीशी लढा देत ठामपणे उभे ठाकलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भेटणार, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणार, यामुळे जिल्ह्यातील सैनिक सुखावले होते. मात्र हा दौरा अचानक रद्द झाल्याने निष्ठावंत शिवसैनिकांचा हिरमोड झाला आहे.

दुसरीकडे या दौऱ्याकडे महायुतीचे ही लक्ष लागले होते. पण हा नियोजित दौरा रद्द झाला आणि आता उद्धव ठाकरे पुन्हा निष्ठावंतांना कधी भेटणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसाचा धाराशिव जिल्हा दौरा ठरला होता. या दौऱ्याची पूर्वतयारी, नियोजन ही झाले होते. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन आणि धाराशिव जिल्हा मुख्यालयी मुक्काम, जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात मेळावे, असे नियिजन करण्यात आले होते. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र आता हे सगळे नियोजन फसले असून उद्धव ठाकरेंचा दौरा अनिश्चित काळासाठी रद्द झाला आहे. हा दौरा रद्द होण्यामागे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तापलेले वातावरण, सुरु असलेले आंदोलन हे कारण असल्याची चर्चा आहे. परंतु लवकरच उद्धव ठाकरे जिल्हा दौऱ्यावर येतील, अशा ठाकरे गटाचे स्थानिक नेते सांगत आहेत. राज्यामध्ये झालेल्या राजकीय पडझडीच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निष्ठावंत शिवसैनिकांना नेमका काय संदेश देतात? याची उत्सुकता होती.

Uddhav Thackeray
Loksabha Parbhani Constituency : महायुतीचे कार्यकर्ते पेचात, कोणता झेंडा घेऊ हाती

निष्ठावंत शिवसैनिकांसाठी ठाकरेंचीच शिवसेना खरी असं बोललं जातं. आगामी लोकसभा निवडणूक आणि त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा होणारा धाराशिव दौरा शिवसैनिकांचा उत्साह वाढवणारा ठरणार होता. पण तो होण्याआधीच या उत्साहावर पाणी फिरले, अशी चर्चा दौरा रद्द झाल्यानंतर होऊ लागली आहे. यापूर्वीही धाराशिव जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दौरे आणि सभा झाल्या आहेत. या सभांमधून शिवसैनिकांना ऊर्जाही मिळत होती.

Uddhav Thackeray
Mahadev Jankar : ... तर 10 मिनिटांसाठी पंतप्रधान होईन

ठाकरे यांच्या भाषणाने प्रभावित होऊन जिल्हाभर शिवसेनेचे संघटन बळकट करणारे कार्यकर्त्यांचे मोठे वर्तुळ जिल्ह्यात तयार झाले. 2022 मध्ये शिवसेना पक्षामध्ये फूट पडली त्याचे पडसाद धाराशिव जिल्ह्यातील उमटले. अनेक शिवसैनिक शिंदे गटात सामील झाले, तर काही पदाधिकारी व कार्यकर्ते ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहीले. निष्ठावंत शिवसैनिक त्यांना उद्धव ठाकरे यांचा दौरा या राजकीय पडझडीच्या काळात मोठे बळ देणारा ठरणार होता.

Uddhav Thackeray
BJP On Nashik Lok Sabha Constituency :भाजपचा गेम प्लान... शिंदे, अजित पवार गटाचे धाबे दणाणले

शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले नव्हते. यामुळे पक्ष फुटी नंतर संघटन बळकट करण्यासाठी शिवसैनिकांना कानमंत्र आणि विरोधकांना आपल्या ठाकरे शैलीत ते काय आव्हान देणार? याची उत्सुकता शिवसैनिकांमध्ये होती. ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये इतर पक्षातील काही पदाधिकारी व कार्यकर्ते प्रवेश करणार होते, तेही आता लांबणीवर पडले आहेत. ठाकरे यांचा हा रद्द झालेला दौरा आता पुन्हा केव्हा होणार याकडे निष्ठावंतांचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray
Kedar Dighe on Eknath Shinde : शिवसेना वाचवण्यासाठीच नागरिक शिंदेंची सभा सोडून जातात...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com