Santosh Bangar, Eknath Shinde, Baburao Kadam Sarkarnama
मराठवाडा

Santosh Bangar : संतोष बांगरांनी CM शिंदेंसमोर गायलं गाणं पण निकालात काय झालं?

Jagdish Patil

Hingoli Lok Sabha Result 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर झाला. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय नेतेमंडळींनी प्रचारासाठी महाराष्ट्र पिंजून काढला. कधी मतदारांना आकर्षित करण्यासाठी तर कधी वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी नेत्यांनी अनेक आश्वासनं दिल्याचं या निवडणुकी दरम्यान पाहायला मिळालं.

शिवाय अनेक नेतेमंडळींनी या काळात आपल्या विरोधकांना आव्हान दिलं तर कधी वेगवेगळी विधानं केली. मात्र निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर यातील अनेकांनी आपल्या वक्तव्यावरुन युटर्न घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

नेत्यांच्या याच जुन्या व्हिडीओचा संदर्भ देत साम टीव्हीने 'निवडणुकीत चॅलेंज देणाऱ्या नेत्यांचं काय झालं?' या नावाच्या व्हिडीओ क्लिपमधून नेत्यांचे दावे कसे फोल ठरले हे दाखवलं आहे. या व्हिडिओमध्ये शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या एका व्हिडिओचा समावेश आहे. ज्यामध्ये त्यांनी महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचारसभेत आला 'बाबुराव आता आला बाबुराव' गाणं गायलं होतं.

या प्रचार सभेत बांगर यांनी कदम यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं होतं. मात्र, निवडणुकीत बाबुराव कदम यांचा पराभव झाला आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena) नागेश पाटील आष्टीकर हे विजयी झाले. त्यामुळे आला बाबुराव म्हणणाऱ्या बांगर यांना विरोधक ' कसे गेले बाबुराव' असं म्हणत डिवचत आहेत.

बागंरानी कधी गायलं होतं गाणं

महायुती आणि शिंदेंच्या शिवसेनेचे हिंगोली मतदारसंघाचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचारार्थ हिंगोलीत प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांसमोरच आमदार संतोष बांगर यांनी 'शांता गेली शालू गेली आता कोणाचं नाव, आला बाबुराव आता आला बाबुराव' या गाण्यामुळे उपस्थितांना आपलं हसू आवरणं कठीण झालं होतं. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर मात्र शिंदे गटाच्या नेत्यांवर तोंड लपवण्याची वेळ आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT