Hingoli News : महायुतीच्या जागावाटपात मतदारसंघ सोडवूण घेण्यासाठी शिवसेना शिंदे गटाला संघर्ष करावा लागत आहे. यातच हिंगोली लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना जाहीर केलेली उमेदवारी भाजपच्या दबावामुळे मागे घ्यावी लागली. मुख्यमंत्र्यांनी एक पाऊल मागे येत हा कठोर निर्णय घेतला, पण जागा काही भाजपला सोडली नाही.बाबुराव कदम कोहळीकर या सामान्य शिवसैनिकाला लोकसभेची उमेदवार देत ही जागा प्रतिष्ठेची केली.
कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला स्वतः मुख्यमंत्री हिंगोलीत आले होते.आताही बाबुराव कदम यांना निवडून आणण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) स्वतः लक्ष घालत आहेत. बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचाराला चक्क बॉलिवूडचा 'राजा बाबू', 'हिरो नंबर 1' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता गोविंदा यांनाच प्रचारात उतरवण्यात आले आहे. आज हिंगोलीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत गोविंदाची उपस्थिती सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देऊन गेली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
हिंगोली (Hingoli) लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेत उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला होता. परंतु हिंगोलीतून उमेदवारी मिळवतांना पाटील यांना बरीच कसरत करावी लागली होती. मुख्यमंत्र्यांनी हिंगोलीची जागा शिवसेनेकडे घेत हेमंत पाटील यांना पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर केली होती. परंतु पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत ती बदलण्याची मागणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी लावून धरली होती.
हेमंत पाटील यांच्याबद्दल जनतेत नाराजी आहे, ते निवडून येणार नाहीत, असा अहवाल असल्याचा दावा भाजपने (Bjp) केला होता. या शिवाय बंडखोरीचीही तयारी काही उमेदवारांनी केली होती. या पार्श्वभूमीवर शिंदेंनी हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबुराव कदम यांना उमेदवारी दिली. त्यानंतर भाजपच्या रामदास पाटील सुमठाणकर, योगी शाम भारती यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.परंतु अॅड. जाधव यांनी मात्र आपली उमेदवारी कायम ठेवत बंडखोरी केलीच.
आता शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर विरुद्ध शिंदे गटाचे बाबुराव कदम कोहळीकर यांच्यात थेट लढत होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूनी प्रचाराला वेग आला आहे. महायुतीचा संवाद मेळावा आज हिंगोलीत पार पडला. तत्पुर्वी कोहळीकर यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी विविध निवडणुक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली, तसेच आवश्यक मार्गदर्शन व सूचना करण्यात आल्या.
कोहळीकर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. बैठकीला डॉक्टर्स, व्यापारी वकील बांधवांची उपस्थिती होती. बैठकीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत ,आमदार संतोष बांगर, प्रसिद्ध सिनेअभिनेते गोविंदा आहुजा, आमदार तानाजी मुटकुळे,भाजपा मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, माजी आमदार गजानन घुगे, रामराव वडकुते यांच्या सह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Edited by : Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.