हिंगोलीत राजकीय फोडाफोडीला जोर येत असून शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या हालचालींमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
भाजपचा एक उमेदवार अचानक माघार घेत थेट शिवसेनेमध्ये प्रवेश केला, तर दुसऱ्याने प्रकृतीचं कारण देत स्पर्धेतून बाहेर पडल्याचे सांगितले.
या घडामोडींमुळे हिंगोलीतील भाजप संघटनात अस्थिरता वाढली असून शिवसेनेचे स्थान अधिक मजबूत झाले आहे.
Local Body Election News : महायुतीतील भाजप आणि शिवसेना पक्षामध्ये सध्या प्रचंड तानातानी सुरू आहे. एकमेकांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते फोडण्यापर्यंत ठीक होते. पण आता चक्क अधिकृत उमेदवारांनाच पळवले जात असल्याचा प्रकार हिंगोलीमध्ये घडला आहे. भाजपकडून नगरसेवक पदासाठी अधिकृत उमेदवारी दाखल केलेल्या दोन उमेदवारांनी माघार घेत पक्षाला धक्का दिला आहे. पैकी एकाने आमदार संतोष बांगर यांच्यावर विश्वास दाखवत थेट शिवसेनेत प्रवेश केला. तर एकाने तब्येतीचे कारण पुढे करत माघार घेतली.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना-भाजप या सत्ताधारी पक्षात सध्या चांगलीच जुंपली आहे. मंत्रीमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंच्या मंत्र्यांना सुनावले. तर तिकडे थेट दिल्लीत अमित शाहांच्या भेटीसाठी गेलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पदरीही निराशाच पडल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीतून माघार घेण्याची मुदत संपेपर्यंत फोडाफोडीचा कार्यक्रम सुरूच राहणार असे दिसते.
हिंगोलीत आज प्रभाग क्रमांक सोळा (ब) भाजपचे उमेदवार असलेल्या भास्कर बांगर यांनी माघार घेत थेट आमदार संतोष बांगर यांची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला. तर भाजपचे नगरसेवक पदाचे दुसरे उमेदवार विजय काळे यांनी वैद्यकीय कारण देत माघार घेत असल्याचे सांगितले. एकाच वेळी दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने मतदानाआधीच भाजपला धक्का बसल्याची चर्चा हिंगोलीत सुरू झाली आहे.
हिंगोली, कळमनुरी व वसमत पालिकांमधून काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढतीचे चित्र आहे. तीनही पालिकांतून आता उमेदवारी अर्ज माघार घेण्यास सुरुवात झाली आहे. आपापले प्रभाग सुरक्षित करण्यासाठी बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यासाठी बैठकांनाही ऊत आला असून इच्छूक उमेदवारांना कोणाला पक्षात चांगल्या पदावर तर कोणाला स्विकृत सदस्य म्हणून घेण्याचे आश्वासन दिले जात आहे.
हिंगोली नगरपालिकेत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढत आहे. आमदार संतोष बांगर यांनी आपल्या भावजयीलाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. आमदार तान्हाजी मुटकुळे आणि संतोष बांगर यांच्यात दररोर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. एकमेकांची उणीदूणी काढली जात असल्याने हिंगोलीत महायुतीतील दोन पक्षच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.
दरम्यान, शिवसेनेकडून फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. विनाकारण भाजपासोबत वैर निर्माण करुन कलह माजवला जात आहे.पैशाच्या जोरावर भाजपाचे पदाधिकारी फोडण्याचे काम कळमनुरीच्या आमदारांकडून होत आहे.भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदेसेनेत प्रवेश करीत आहेत. दोन दिवसांपूर्वीच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपाला सोडून शिंदेसेनेत प्रवेश केला. या प्रकरणाची आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार, असल्याचे हिंगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी म्हटले आहे.
संतोष बांगरांच्या प्रभावामुळे भाजपचे दोन उमेदवार आपापल्या भूमिका बदलताना दिसले – एकाने माघार घेतली आणि दुसऱ्याने थेट शिवसेनेत प्रवेश केला.
त्यांनी ‘प्रकृतीचे कारण’ देत स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला.
स्थानिक नेत्यांच्या संपर्कात येत त्यांनी अचानक पक्ष बदल करण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या दबदब्यामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.
शिवसेनेला फायदा होण्याची शक्यता वाढली असून भाजपचे संघटन कमकुवत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.