Devgiri Fort Fire News Sarkarnama
मराठवाडा

Devgiri Fort Fire News : अजिंक्य 'देवगिरी किल्ला' होरपळला! सात तासानंतर आग आटोक्यात..

A historical fire broke out at Devgiri Fort, which was brought under control after seven hours of intense efforts. : पुरातत्व विभागाकडेही स्वतःची काही अंतर्गत फायर सेफ्टी सिस्टीम नसल्यामुळे सकाळी साडे नऊ वाजता पेटलेला वणवा सायकाळी शांत झाला. किल्यावरील आग वाऱ्याचा वेग कमी झाल्याने विझली

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा असलेला मराठवाड्याची ओळख व यादवकालीन ऐतिहासिक वारसा सांगणारा अभेद्य, अजिक्य असा देवगिरी किल्ला सध्या होरपळतोयं. किल्ल्याच्या परिसरात वाळलेल्या गवत आणि छोट्या-छोट्या झाडांना वणव्यामुळे लागलेली आग थेट माथ्यापर्यंत जाऊन पोहचली. सकाळी नऊ वाजेपासून लागलेली आग सायंकाळी आटोक्यात आली.

केंद्रीय पुरातत्व विभागाअंतर्गत येणारा हा ऐतिहासिक वारसा दिवसभर आगीच्या ज्वाळांमध्ये वेढला गेला असताना प्रशासन मात्र हतबल होऊन हे सगळे पाहतं होते. अग्नीशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले, पण किल्यावर लागलेली आग विझवणे किल्याची तटबंदी, खंदकामुळे शक्य झाले नाही. (Marathwada) दरवर्षीच उन्हाळ्यात किल्ला परिसरात वणवा भडकतो, पण यावेळी इतिहासात पहिल्यांदाच बालेकिल्ल्यावर असलेल्या बारादरीलाच आगीने वेढले.

खाली काला कोटमधून आगीला सुरुवात झाली आणि वाऱ्याने आगीचे लोट वरपर्यंत गेले. बारादरीच्या छताला आणि सज्ज्याला असलेल्या लाकडी तुळयांनीही पेट घेतला होता. (Chhatrapati Sambhajinagar) पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बारादरीची आग आटोक्यात आणली, पण बाकी किल्ल्यावर भडकलेला वणवा चारही बाजूंनी पसरला. अग्निशमन दलाचे पाच बंब सकाळपासून किल्ल्याबाहेर उभे होते.

पण कुठूनच आत जाता येत नसल्यामुळे त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काहीही करता आले नाही. पुरातत्व विभागाकडेही स्वतःची काही अंतर्गत फायर सेफ्टी सिस्टीम नसल्यामुळे सकाळी साडे नऊ वाजता पेटलेला वणवा सायकाळी शांत झाला. किल्यावरील आग वाऱ्याचा वेग कमी झाल्याने विझली, तर पायथ्याशी लागलेली आग गावकरी, अग्निशमाक दल यांच्या प्रयत्नाने आटोक्यात आली. दरम्यान, ही आग वणवा पेटल्यामुळे लागली, की कोणी लावली? यावर दिवसभर चर्चा सुरू होती. किल्ला परिसरातील मोर, सरपटणारे अनेक प्राणी या आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याची माहिती आहे.

देवगिरीचा इतिहास..

देवगिरी किल्ल्याला 28 नोव्हेंबर, 1951 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. इ.स.1327 मध्ये अल्लाउद्दीन खिलजी या उत्तरेतील सुल्तानाने दख्खन प्रांतात क्रूर आक्रमण करून हिंदूंना लक्ष्य केले. देवगिरीच्या यादवांनी याविरोधात मोठा देत अनेक लढाया जिंकल्या. यादवांच्या लढाऊ बाण्यामुळे अल्लाउद्दीन खिलजीला ही मोहीम सोडून द्यावी लागली. तरीही मुस्लिम आक्रमकांनी महाराष्ट्राची संपत्ती लुटली. सेनापती मलीक कफूर याने अल्ला‍उद्दीनचे काम पुढे चालू ठेवले आणि इ.स.1310 मध्ये यादवांची सत्ता लयाला गेली.

अल्ला‍उद्दीनचे अनुकरण मुहम्मद बिन तुघलक (इ.स. 1324-1350) या दिल्लीच्या सुलतानाने करून आपली सत्ता वाढविण्यासाठी दक्षिणेतील मदुरेपर्यंत आक्रमणे केली. 1326 मध्ये मुहम्मद बिन तुघलक या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी देवगिरीवर आणली व देवगिरीचे नाव दौलताबाद केले. दिल्लीहून आपली राजधानी दौलताबादेस आणण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला. ही राजधानी परत दिल्लीला न्यावी लागली. राजधानीचे शहर म्हणून देवगिरीला एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न मोहम्मद तुघलकाच्या काळामध्ये झाला. मुहम्मद बिन तुघलक परत गेल्यावर किल्ल्याचे नाव पूर्ववतपणे देवगिरी झाले.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT