Maharashtra forts : महायुती शिवप्रेमींना सुखद धक्का देणार? 'त्या' गडकिल्ल्यांबाबत केंद्र सरकारकडे केली मोठी मागणी

Ashish Shelar letter to center : "छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे संरक्षण आणि संवर्धन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी, मी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना पत्राद्वारे विनंती केली आहे की भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारितील हे किल्ले राज्याच्या पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित करावेत."
Maharashtra forts
Maharashtra fortsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 25 Mar : महाराष्ट्रातील गडकिल्ले हे शिवप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आता याच गडकिल्ल्यांबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केंद्र सरकारकडे मोठी मागणी केली आहे.

भारतीय पुरातत्व विभागाच्या (Archaeological Survey of India) अखत्यारीत असलेले राज्यातील सर्व गडकिल्ले हे राज्य सरकारकडे हस्तांतरित करावेत, अशी मागणी मंत्री शेलार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना पत्र लिहिलं आहे.

राज्यातील बहुतांश किल्ले हे केंद्रीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहेत. त्यामुळे या किल्ल्यांची डागडुजी करण्यासाठी पुरातत्व विभागाची परवानगी घ्यावी लागते. पुरातत्व खात्याच्या परवानगीशिवाय राज्य सरकारला या किल्ल्यांवर काहीही करता येत नाही.

Maharashtra forts
Sushma Andhare On Eknath Shinde : 'गद्दार' म्हणून चर्चेत कोण आणतंय, शिंदेंनी आजूबाजूला बसणारे तपासावे! अंधारे यांचा थेट फडणवीसांकडे इशारा..

त्यामुळेच आता राज्य सरकारने हे सर्व किल्ले राज्याच्या स्वाधीन करावे अशी मागणी शेलार यांनी केली आहे. मंत्री शेलार (Ashish Shelar) यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे संरक्षण आणि संवर्धन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी, मी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना पत्राद्वारे विनंती केली आहे की भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारितील हे किल्ले राज्याच्या पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित करावेत.

Maharashtra forts
Nitesh Rane Malhar certification : राजकारणाला 'मटणाचा झटका'

राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराजांच्या १२ किल्ल्यांचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच, गड-किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना देखील करण्यात आली आहे. या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे, आणि या दिशेने राज्य सरकार ठोस पावले उचलत आहे."

54 गडकिल्ले केंद्राच्या अखत्यारीत

जर राज्यातील सर्व किल्ले सरकारकडे दिले तर त्यांची देखभाल, दुरूस्ती आणि विकास कामांना अधिक गतीने करता येऊ येऊ शकतात, असं त्यानी आपल्या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान, छत्रपती श‍िवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आण‍ि मराठा साम्राज्याच्या इतिहासाची साक्ष देणारे राज्यातील 54 गडकिल्ले सध्या केंद्रीय पुरातत्व खात्याकडे आहेत. तर 62 गडकिल्ले राज्य सरकारच्या अधिपत्याखाली आहेत.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com