अविनाश काळे
Umarga News : केंद्र आणि राज्य सरकारने आतापर्यंत जाहीर केलेल्या विविध घोषणा फसव्या आहेत, असा आरोप करत ठाकरे गटाकडून त्याची राज्यभरात पोलखोल केली जात आहे. या मोहिमेला 'होऊ दे चर्चा' असे नाव देण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील विविध गावांत ठाकरे गटाकडून ही मोहीम राबवली जात आहे. गावागावांमध्ये त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. येत्या १२ ऑक्टोबरपर्यंत हा उपक्रम तालुक्यात राबवला जाणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या(Shivsena) वतीने एक ते १२ ऑक्टोबरदरम्यान उमरगा - लोहारा विधानसभा मतदारसंघात विविध शासकीय योजनांचा भांडाफोड करण्यासाठी सुरू असलेल्या 'होऊ द्या चर्चा' या उपक्रमाला विविध गावांत नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. उमरग्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ३० सप्टेंबरला या उपक्रमाची जनजागृती करणाऱ्या रथाचे पूजन करण्यात आले.
केंद्र व राज्य सरकारच्या योजना किती फसव्या आहेत. हे जनतेपर्यंत जाऊन पटवून दिले जात आहेत. बॅंक खात्याचा उडालेला बोजवारा, गॅस, डिझेल, पेट्रोल दरवाढ यासह जीवनावश्यक वस्तूंची महागाई, वीजटंचाई, २०२० ची २३० कोटींची पीकविम्याची प्रलंबित रक्कम आदी मुद्द्यांवर केंद्र व राज्य सरकारचा भांडाफोड केला जात आहे.
मुरूम येथे झालेल्या सभेत धाराशिवचे माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, ज्येष्ठ शिवसैनिक सुधाकर पाटील, युवा सेनेचे तालुकाप्रमुख अजित चौधरी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या घोषणांवर प्रहार केला. नाईचाकूर, माडज, तलमोड येथे झालेल्या "होऊ द्या चर्चा" (Hou De Charcha) सभेला चांगला प्रतिसाद मिळाला.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे, बसवराज वरनाळे, उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणधीर पवार, माजी नगराध्यक्ष रझ्झाक अत्तार, माजी तालुकाप्रमुख विजयकुमार नागणे, उमरगा शहरप्रमुख राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह ग्रामीण भागातील कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले आहेत. १२ ऑक्टोबरला गुंजोटी, उमरगा व माडज येथे खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा समारोप होणार आहे.
माजी नगराध्यक्षांचा आमदारांवर शाब्दिक प्रहार
स्थानिक आमदारांनी तालुक्याच्या विकासासाठी पाचशो कटी रुपयांचा निधी आणल्याचे सांगितले जात आहे, तशी माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित केली जात आहे. मात्र, अशा पोस्टखाली बहुतांश प्रतिक्रिया नकारात्मक येत आहेत. निधीचा विनियोग योग्य होत नाही असाच त्याचा अर्थ आहे. त्यामुळे होऊ दे चर्चा उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या तकलादू योजनांचा भांडाफोड केला जातोय. स्थानिक आमदार आणि राज्य सरकारच्या विरोधात लाेकांमध्ये नाराजीची सुप्त लाट आहे, असे उमरग्याचे माजी नगराध्यक्ष अब्दुल रझ्झाक अत्तार यांनी सांगितले. याद्वारे त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले(Dnyanraj Chougule)यांच्यावर शाब्दिक प्रहार केला आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.