Shivsena News : लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांनी आज संसदेत देशातील 78 लाख अल्प पेन्शन धारकांच्या प्रश्नाला वाचा फोडली. ईपीएस स्कीम अंतर्गत पेन्शन धारकांना केवळ तीनशे ते साडेतीन हजार रुपयापर्यंतची पेन्शन दिली जाते. याची सरासरी 1170 एवढी असल्याचे भुमरे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यामध्ये पेन्शन धारकाने जगावे कसे? असा सवाल करत ईपीएस पेन्शन धारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची आग्रही मागणी त्यांनी संसदेत केली.
ईपीएस पेन्शन धारकांची महाराष्ट्रात 24 लाख एवढी संख्या आहे. तर देशात हा आकडा 78 लाखांच्या वर आहे. गेल्या कित्येक वर्षापासून हे पेन्शन धारक पेन्शनमध्ये वाढ करावी, या मागणीसाठी लढा देत आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखालील भाजप एनडीएचे सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आले. परंतु अद्याप हा प्रश्न निकाली निघालेला नाही. संसदेत आज या विषयावर छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी प्रकाश टाकला.
ईपीएस पेन्शन धारकांना पेन्शनमध्ये वाढ मिळावी यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भुमरे यांनी या अल्प पेन्शन धारकांची व्यथा मांडली. (Parliament Session) राज्य व केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली अनेक उद्योगात काम करत असलेल्या कामगारांनी त्यांच्या सेवाकाळात पेन्शन, फंड साठी दरमहा 417, 541, 1250 रुपये अंशदान जमा केले आहे. ईपीएस 95 स्कीम ही ओपीएस, एमपीएस, युपीएस या पेक्षा भिन्न आहे.
ईपीएस 95 पेन्शन धारकांना मिळत असलेली पेन्शन ही अगदी अत्यल्प म्हणजे 300 रुपयांपासून ते 3500 एवढी आहे. याची सरासरी केवळ 1170 एवढी येते. देशात आज वाढलेली महागाई पाहता 78 लाख ईपीएस 95 पेन्शन धारकांनी जगावे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात 14 लाखाच्या वर हे पेन्शन धारक आहेत. कितीही महागाई वाढली तरी यांच्या पेन्शन मध्ये कवडीची वाढ झाली नाही.
असह्य आणि कष्टात जीवन जगणाऱ्या या लाखो पेन्शन धारकांना सन्मानाने जगता यावे, यासाठी त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करणे गरजेचे आहे. ईपीएस पेन्शन धारकांची दयनीय अवस्था झाली आहे. यातून त्यांची सुटका करण्यासाठी पेन्शनमध्ये सन्मानजनक वाढ करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी भुमरे यांनी सभागृहात केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.