Manoj Jarange Patil News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून (शनिवार) अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू केले आहे. उपोषण सुरू करताना जरांगे पाटील यांनी सरकावर निशाणा साधला.
'आरक्षण न देता मराठ्या समाजाला, धनगर समाजाला येड्यात काढायचं आणि नवीन काय तरी आणायचं. लाडकी बहीण, लाडका भाऊ आता लाडकी मेव्हणी नाहीतर लाडका मेव्हणा आणायचे. निवडणूक होईपर्यंत पैसे वाटायचे.', असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला लगावला.
'गोरगरिबांना लक्ष्यात येत नाही. लाडका बहीण, लाडका भाऊचे पैसे घ्यावे की लेकरांसाठी लढावे. गरीबांना वाटते सरकार पैसे देत आहे. त्यामुळे काय झाले लडका भाऊ, लाडकी बहीण यांची लाईन तिकडे लागली. आता तिथं लाडकी मेव्हणीपण येणार आहे. तिथे झाली गर्दी त्यामुळे साईट पडल्यात बंद त्यामुळे मुलांना अॅडमिशन घेता येत नाहीत. सरकार थोडं काही बधिर झालं आहे का? ' असे मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil म्हणाले.
मुलींना शिक्षण मोफत केलं आहे. पण, मुलींना मोफत शिक्षण मिळत नाही. व्हॅलिडीटीची अट ठेवली आहे. चंद्रकांतदादा म्हणाले, समाजाला आणखी काय द्यावं? महामंडळ आणि सारथी दिल्याचं सांगतात. पण, सारथीमधील विद्यार्थ्यांचे काय हाल आहेत? हे त्यांना एकदा विचारून पाहा. महामंडळातील प्रकरण कशी करण्यात येतात हे सुद्धा गावखेड्यातील तरूणांना जाऊन विचारा.मोफत शिक्षणात अटी टाकल्यात त्यामुळे कोणत्याच जाती धर्माच्या मुलींना मोफत शिक्षण मिळत नाही.
मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. मात्र, पावसाचे दिवस असल्याने शेतीची कामे उरका, अंतरवालीमध्ये येऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.