Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंकडून उपोषणाच्या काही तास आधीच शिंदे सरकारचं कौतुक; म्हणाले...

Maratha Reservation News : राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटला आहे. आता पुन्हा एकदा 'सगेसोयरे'च्या अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करणार आहे.
Eknath Shinde, Manoj Jarange Patil
Eknath Shinde, Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Jalna News : मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांचं वर्षभरात आता चौथ्यांदा बेमुदत उपोषणाला बसणार आहे. त्यांच्या या आधीच्या उपोषणांनी सरकारची डोकेदुखी चांगलीच वाढवली होती.त्यानंतर राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटला आहे. आता पुन्हा एकदा 'सगेसोयरे'च्या अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी जरांगे उपोषण करणार आहे.

याच जरांगेंनी वेळोवेळी शिंदे सरकार आणि त्यांच्या मंत्र्‍यांवर आरक्षणावरुन टीकेची झोड उठवली होती. आता याच जरांगेंनी उपोषणाला काही तास शिल्लक राहिले असतानाच शिंदे सरकारचं कौतुक केलं आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी शुक्रवारी(ता.19)जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मीडियाशी संवाद साधला. ते यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासह अनेक मुद्द्यांवर आपल्या नेहमीच्या शैलीत रोखठोक मतं मांडली. यावेळी त्यांनी बहुप्रतिक्षित छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं साताऱ्यातील वस्तुसंग्रहालयात दाखल झाल्यावर भाष्य केलं आहे.

एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात आणण्यावरुन महायुती आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. अशातच आता जरांगे पाटलांनी याच मुद्द्यावरुन सरकारचं कौतुक केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Eknath Shinde, Manoj Jarange Patil
Satara Wagh Nakh News : उदयनराजेंनंतर फडणवीसही गोंधळले; औरंगजेब की अफझल खान...?

जरांगे म्हणाले, राज्य सरकारनं वाघनखं भारतात आणलं हे अतिशय चांगलं काम केलं आहे.मी देखील ही वाघनखं पाहण्यासाठी सातारा येथे जाणार असल्याचे सांगत सरकारचं कौतुकही केलं आहे.

उद्याच्या उपोषणावर ठाम असल्याचेही मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितले.आमचा मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर विश्वास असून ते जे काही करायचं,ते करतील.पण उद्याचं उपोषण होणारच आहे. प्रशासन किंवा शासन भेटीला आले नाही म्हणून उपोषण थांबणार नाही अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.

Eknath Shinde, Manoj Jarange Patil
Nilesh Lanke : सुजय विखेंना चितपट करणारे नीलेश लंके पुन्हा मैदानात, कबड्डीच्या डावातील चढाई यशस्वी!

मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणारी लंडनच्या व्हिक्टोरिया ॲन्ड अल्बर्ट म्युझियमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे अखेर साताऱ्यामध्ये आणण्यात आली. ऐतिहासिक वाघनखांसह ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन करण्यात आलं.सातारा शहरात वाघनखांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने स्वागत केले.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे उपस्थित होते.सात महिने ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात असणार आहेत. प्रत्येक नागरिकांना या वाघनखांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.

Eknath Shinde, Manoj Jarange Patil
Satara Wagh Nakh News : उदयनराजेंनंतर फडणवीसही गोंधळले; औरंगजेब की अफझल खान...?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com