Astik kumar pandy  Sarkarnama
मराठवाडा

Astik Kumar Pandey News : ''मला 'ईडी'ची कोणतीही नोटीस नाही!'';जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेंचं स्पष्टीकरण

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : छत्रपती संभाजीनगरमधील घरकुल गैरव्यवहारप्रकरणी ईडीने यापूर्वी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली होती.

सरकारनामा ब्यूरो

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेतील 40 हजार घरं बांधण्यासाठी चार हजार कोटी रुपयांच्या बांधकाम निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र, निविदा प्रक्रियेत कंपनीकडून घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात 19 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे( यांना देखील ईडीची नोटीस आल्याची चर्चा होती. परंतू, आता मला ईडीची कोणतीही नोटीस आली नसल्याची माहिती आस्तिककुमार पांडेय यांनी दिली आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील घरकुल गैरव्यवहारप्रकरणी ईडीने यापूर्वी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली होती. तसेच सोमवारी(दि.८) दुपारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांना देखील ईडीची नोटीस आल्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली होती. पण आता अशी कोणतीही नोटीस मला आली नसल्याची माहिती आस्तिक कुमार पांडेय (Astik Kumar Pandey)यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली.

आस्तिक कुमार पांडेय काय म्हणाले?

मी नवीन मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या भेटीसाठी मुंबईत आलो आहे. त्यामुळे मला अद्याप अशी कुठलीही नोटीस मिळाली नसल्याची माहिती आस्तिक कुमार पांडे यांनी दिली आहे. घरकुल घोटाळा प्रकरणामुळे महापालिका स्तरावर मोठ्या प्रमाणात बदनामी देखील झाली आहे. तसेच केंद्रीय पातळीवर देखील या प्रकरणात जागेपासून कुठलेच काम न झाल्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनी देखील नाराजी वर्तवली आहे.

देशात इतर ठिकाणी घरकुलबाबतची कामे वेगाने होत असताना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) मात्र याबाबतीत पिछाडीवर पडले आहे. त्यामुळे या प्रकरणात ईडी माध्यमातून देखील चौकशी करण्यात येत आहे असंही पांडे यावेळी म्हणाले.

काय आहे प्रकरण?

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेतील 40 हजार घरे बांधण्यासाठी चार हजार कोटी रुपयांच्या बांधकाम निविदा काढण्यात आल्या होत्या. या प्रक्रियेत अनेक कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. दरम्यान, यातील काही कंपन्यांनी अटींचे पालन न करता फसवणूक करण्याच्या प्रयत्न केल्याचे समोर आले.

समरथ कन्स्ट्रक्शन, इंडोग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस आणि जगवार ग्लोबल सर्व्हिसेस या तीन कंपन्यांनी एकाच लॅपटॉपवरुन म्हणजे एकाच आयपी अ‍ॅड्रेसवरुन निविदा भरल्याचे महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांच्या लक्षात आले. त्यामुळे महापालिकेच्या घरकुल बांधणीसाठी निविदा भरताना ‘रिंग’ केल्याचा ठपका ठेवत या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात19 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT