Ajit Pawar News : स्ट्रॉबेरी बघून शेती होते व्हयं....अजितदादांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Koregaon APMC कोरेगाव येथे बाजार समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार व रामराजेच्या आभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
Eknath Shinde, Ajit Pawar
Eknath Shinde, Ajit Pawarsarkarnama

-उमेश बांबरे

Koregaon NCP News : काय झालं की मुख्यमंत्री Eknath Shinde साताऱ्यात त्यांच्या गावी येऊन दोन तीन दिवस राहतात. काय करतात तर शेती करतोय. स्ट्रॉबेरी पाहून कधी शेती होती का, असा प्रश्न करुन कधी झाडं बघायचे तर कधी आणखी काय... अशा शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार Ajit Pawar यांनी मुख्यमंत्र्यांच्या शेती करण्याची टिंगल उडवली.

कोरेगाव येथे बाजार समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार व रामराजेच्या आभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde, मकरंद पाटील,दीपक चव्हाण, नितीन पाटील, सुनील माने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, काय झालं की मुख्यमंत्री साता-यात दाेन, तीन दिवस इथे येऊन राहतात. काय करता तर शेती करताेय. स्ट्राॅबेरीपाहून कधी शेती हाेती का, असा सवाल करून कधी झाडं बघायचे आणि कधी आणखी काय... असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांची मिमिक्री केली.

Eknath Shinde, Ajit Pawar
Koregaon APMC News : कोरेगावात लोकांच्या उद्रेकाला सुरवात; विरोधकांचे गणित त्यांच्यावरच उलटले... शशिकांत शिंदे

लाेक विचारतात कशाला गेलेत. मग त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात येते फाईल काढायला गेलेत अन् फाईल काढून काढून किती काढल्या तर 65. आम्ही दाेन तीन तासांत इतक्या फाईल काढताे, असा चिमटा अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काढला.

Eknath Shinde, Ajit Pawar
Ajit Pawar News : सध्याचे सरकार भ्रष्टाचाराने बरबटलंय; बदल्यांसाठीही त्यांचे रेट ठरलेत... अजित पवारांची जहरी टीका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com