Idris Multani after being reappointed as BJP Minority Morcha Maharashtra President following Sillod-Soygaon political gains against Abdul Sattar. Sarkarnama
मराठवाडा

BJP News : अब्दुल सत्तार यांना भिडलेल्या इद्रिस मुलतानी यांना भाजपाचे बक्षीस; बावनकुळेंपाठोपाठ चव्हाणांनीही दिली मोठी जबाबदारी

Idris Multani News : सिल्लोड–सोयगावमध्ये अब्दुल सत्तार यांना टक्कर देत यश मिळवल्यानंतर भाजपाने इद्रिस मुलतानी यांची अल्पसंख्याक मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी पुनर्नियुक्ती केली असून विधानसभा दाव्याची चर्चा रंगली आहे.

Jagdish Pansare

BJP Minority Morcha Maharashtra : शिवसेनेचे आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना सिल्लोड-सोयगांव मतदारसंघात टक्कर देत भाजपाला चांगले यश मिळवून दिल्याबद्दल भाजपाने इद्रिस मुलतानी यांना दुसऱ्यांदा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष केले. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत इद्रिस मुलतानी यांनी सिल्लोड-सोयगाव या अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात जोरदार मुसंडी मारली. विशेषतः सोयगाव तालुक्यात भाजपाने अब्दुल सत्तार यांचा विजय रथ रोखला.

अब्दुल सत्तार यांची मतदारसंघावरील पकड ढिली झाल्याचे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निकालावरून दिसून आले आहे. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या 2420 मतांनी सत्तार हे निवडून आले होते. भाजपाच्या सुरेश बनकर यांनी सत्तार यांचे हवेत उडणारे विमान जमीनीवर उतरवण्याचे काम चोखपणे केले होते. लाखोच्या मताधिक्याचा दावा करणाऱ्या सत्तार यांना काठावर झालेला हा विजय चांगलाच जिव्हारी लागला होता.

परंतु त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी पुन्हा नव्याने संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. नगरपालिका, नगरपंचयात एकहाती राखल्यानंतर जिल्हा परिषदेत तोच करिश्मा दिसेल अशी अपेक्षा होती. परंतु भाजपाने मतदारसंघात सत्तार यांच्या एकाहाती विजयाला ब्रेक लावण्यात यश मिळवले. विशेषतः सोयगाव तालुक्यात इद्रिस मुलतानी यांनी चांगला जोर लावला आणि भाजपाला यश मिळवून दिले. फर्दापूर जिल्हा परिषद सर्कलमधून मुलगी माहीमा हिला सर्वाधिक मतांनी निवडून आणत मुलतानी यांनी सत्तार यांना दणका दिला.

या शिवाय पंचायत समितीमध्येही सत्तार यांच्या उमेदवारांना धूळ चारण्यात मुलतानी व त्यांची टीम यशस्वी ठरली होती. जिल्हा परिषदेच्या 11 पैकी 5 तर पंचायत समितीच्या 18 पैकी 12 जागा जिंकत भाजपाने अब्दुल सत्तार यांच्या वर्चस्वाला हादरे दिले. इद्रिस मुलतानी यांची भूमिका यात महत्त्वाची ठरली होती. या शिवाय भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या इद्रिस मुलतानी यांनी राज्यभरात दौरे करत नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका, जिल्हा परिषद या सगळ्याच निवडणुकींमध्ये भाजपासाठी प्रचार दौरे केले. त्याचाही फायदा पक्षाला झाल्याचे बोलले जाते.

या सगळ्या गोष्टींचा विचार करत भाजपाने इद्रिस मुलतानी यांना दुसऱ्यांदा राज्याच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली. मतदारसंघ पुनर्रचनेत सोयगाव विधानसभा मतदारसंघ स्वतंत्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाले तर भाजपाकडून इद्रिस मुलतानी यांचा विधानसभेसाठी दावा असणार आहे, अशीही चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT