Bjp News : भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदी इद्रीस मुलतानी

Maharashtra : आपल्यावर टाकलेला विश्वास आपण सार्थ ठरवू, अशी प्रतिक्रिया मुलतानी यांनी दिली.
Bjp News, Marathwada
Bjp News, MarathwadaSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पदाधिकारी नियुक्त्यांचा धडका लावला आहे. जिल्हा, ग्रामीण अध्यक्षांसह कार्यकारणीची निवड प्रक्रिया रखडली असली तरी राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात येत आहेत. (Bjp News) भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदी इद्रीस मुलतानी यांची निवड करण्यात आली आहे.

Bjp News, Marathwada
Harshvardhan Jadhav News : औरंगजेबाला आदर्श मानणारे मुख्यमंत्री केसीआर यांच्यासोबत कसे ? बीआरएसमध्ये थिणगी पडली..

सिल्लोड येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन इद्रीस मुलतानी यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई येथे झालेल्या (Bjp) भाजपाच्या बैठकीत त्यांना नियुक्ती पत्र दिले. मुलतानी हे गेल्या पंचवीस वर्षापासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी सरपंच तांडाबाजार, पंचायत समिती सदस्य, उपसभापती पंचायत समिती सिल्लोड,चेअरमन सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना आदी निवडणूकीत यश मिळवलेले आहे.

संघटनेत मुलतानी यांनी भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष, भाजपा युवा मोर्च्या जिल्हाध्यक्ष, भाजपा युवा मोर्च्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य,भाजपा प्रदेश चिटणीस ही पदे देखील भुषवली आहेत. (Marathwada) पक्षाने आता त्यांना बढती देत त्यांच्यावर अल्पसंख्याक आघाडीची राज्याची जबाबदारी सोपवली आहे. (Maharashtra) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास आपण सार्थ ठरवू, अशी प्रतिक्रिया मुलतानी यांनी दिली.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड, भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, सहकार मंत्री अतुल सावे, माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे, संभाजी पाटील निलंगेकर, प्रशांत बंब, संतोष दानवे, मेघना बोर्डीकर, नारायण कुचे आदींनी या निवडीबद्दल इद्रिस मुलतानी यांचे अभिनंदन केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com