Imtiaz Jalil, Nitesh Rane Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jalil VS Nitesh Rane : ...तर नितेश राणेंना पोलिसांनी फटकावलं असतं; इम्तियाज जलील असं का म्हणाले?

Imtiaz Jalil On Nitesh Rane : "राज्यात काही कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? नितेश राणेंपेक्षा घाण मी बोलू शकतो. तो सकाळी उठला की, हिंदू हिंदू करतो. त्याला पोलिसांनी थोबाडीत मारली पाहिजे होती."

Jagdish Patil

Chhatrapati Sambhajinagar News : "नितेश राणे हा शेंबडं पोर आहे, त्याला महत्व देऊ नका. चांगला पोलिस अधिकारी असता तर त्याला मारलं असतं," असं म्हणत 'एमआयएम'चे (MIM) नेते इम्तियाज जलील यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्या पोलिसांदर्भातील वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

इम्तियाज जलील म्हणाले, "नितेश राणे (Nitesh Rane) हा शेंबडं पोर त्याला महत्व देऊ नका. चांगला पोलिस अधिकारी असता तर त्याला मारलं असतं. राज्यात काही कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? नितेश राणेंपेक्षा घाण मी बोलू शकतो. तो सकाळी उठला की, हिंदू हिंदू करतो. त्याला पोलिसांनी थोबाडीत मारली पाहिजे होती." अशा शब्दात जलील यांनी राणेंवर टीका केली आहे.

नितेश राणे नेमकं काय म्हणाले?

सांगली येथील शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चा दरम्यान बोलताना नितेश राणे (Nitesh Rane) यांनी लव्ह जिहाद प्रकरणातील तक्रार न घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना इशारा दिला होता. पोलिसांना उद्देशून ते म्हणाले, "सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की, जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही.

मी काही निवेदन वगैरे देत बसत नाही, ती भाषा मला जमत नाही. मी डायरेक्ट कार्यक्रम करतो. पोलिस ठाण्यात लव्ह जिहादशी संबंधित तक्रार देण्यासाठी येणाऱ्या मुलीची तक्रार अर्ध्या तासात घेतली पाहिजे, अन्यथा पुढच्या तीन तासात पोलिस (Police) ठाण्यात दाखल होऊन धिंगाणा घालू."

राणे यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं विरोधकांनी टीका केली. तरीही राणे यांनी आपल्या वक्तव्याचं समर्थन केलं होतं. अशातच आता जलील यांनी राणे म्हणजे शेंबडं पोर असल्याचं म्हणत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जलील यांच्या वक्तव्याला नितेश राणे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT