BJP Vs Shivsena UBT : उद्धव ठाकरेंवर नितेश राणेंनी केलेली टीका शरद कोळींच्या जिव्हारी; 'या' प्राण्याशी तुलना करत म्हणाले...

Nitesh Rane On Uddhav Thackeray : 'महाराष्ट्राला लागलेली कीड म्हणजे उद्धव ठाकरे आहेत', अशी बोचरी टीका भाजप नेते आणि उद्धव ठाकरेंचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
Nitesh Rane, Sharad Koli
Nitesh Rane, Sharad KoliSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Vs BJP : 'महाराष्ट्राला लागलेली कीड म्हणजे उद्धव ठाकरे आहेत', अशी बोचरी टीका भाजप नेते आणि उद्धव ठाकरेंचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे. त्यांच्या याच टीकेला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

नितेश राणे यांचा डुक्कर असा उल्लेख करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते शरद कोळी (Sharad Koli) यांनी हल्लाबोल केला आहे. त्यामुळे आता ठाकरे गट विरुद्ध राणे यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचा खेळ पुन्हा एकदा सुरु झाला आहे.

"द्वेषाचं कॉन्ट्रॅक्टर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) घेतलं आहे. त्यांना एकदा पॅकअप करुन लंडनला पाठवण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राला लागलेली कीड म्हणजे उद्धव ठाकरे आहेत आणि ती कीड आम्ही ऑक्टोबरमध्ये उखडून टाकणार आहोत," अशा शब्दात नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

Nitesh Rane, Sharad Koli
Video Laxman Hake : मनोज जरांगे बिनबुडाचा लोटा, 'ते' लढणार नाहीत; ओबीसी नेत्याचा घणाघात

त्यांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना शरद कोळी म्हणाले, "भाजपने (BJP) नितेश राणे या डुकराला राज्यात कमळ फुलवण्यासाठी सोडलं होतं. मात्र, त्याने या राज्यात चिखल करून ठेवला. नेपाळी औलाद 2-3 महिने थांब, तुला बोऱ्या बिस्तर बांधून नेपाळला पाठवल्याशिवाय राहणार नाही." अशा शब्दात कोळी यांनी राणेंवर टीका केली.

Nitesh Rane, Sharad Koli
Video Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस रॅली काढणार! मनोज जरांगेंनी दिलं चॅलेंज, 'काही करा...'

मात्र, राज्यातील राजकारणात नेत्यांकडून विरोधकांवर टीका करताना भाषेची पातळी दिवसेंदिवस घसरत चालल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय अनेकदा टीका करताना आपण काय बोलतो याचं भान देखील नेत्यांना राहत नसल्याचं सर्वसामान्यांकडून बोललं जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com