Anjali Damania 1 Sarkarnama
मराठवाडा

Anjali Damania : बीडमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवा, अंजली दमानियांच्या मागणीने खळबळ

Anjali Damania Calls for Operation Sindoor in Beed : जसे आपण ऑपरेशन सिंदूर सीमेवर केले होते, तसेच महाराष्ट्राच्या बीडमध्ये केले पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.

Ganesh Sonawane

Anjali Damania news : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान विरोधात 'ऑपरेशन सिंदूर' राबवलं. त्यात भारताने १०० हुन अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या पाकला त्यातून चांगलीच अद्दल घडवली. दुसरीकडे सिंधू नदी पाणी करार स्थगित करुन भारताने पाकिस्तानची कोंडी करुन ठेवली आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान भीतीच्या सावटाखाली आहे. अशातच आता बीड जिल्ह्यातील गुंडाराज संपविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या एका मागणीमुळे खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यात सध्या गुंडगिरी, राजकीय वरदहस्त असलेले स्वयंघोषित दादा-भाई, आणि दिवसेंदिवस वाढणारी दहशत यामुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या हे त्याचेच उदाहरण आहे. या पार्श्वभूमीवर जसे आपण ऑपरेशन सिंदूर सीमेवर केले होते, तसेच महाराष्ट्राच्या बीडमध्ये केले पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यातील परळी म्हणजे आता दहशतीचा अड्डा झालेला आहे. बीड जिल्ह्यातील परिस्थितीला गांभीर्याने घ्यायला हवे. कारण कालची जी मारहाण झाली. त्याच्यात सगळे मुले अतिशय छोटी होती. 18 वर्षाच्या आसपासचे होते. सीमेवर ज्या प्रकारे ऑपरेशन सिंदूर राबवले, तसच महाराष्ट्रात बीडमध्ये केलं पाहिजे, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

बीडमध्ये काल काही तरुणांनी एका तरुणाला केलेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ समोर आला आहे. शिवराज दिवटे असे या तरुणाचे नाव आहे. एका टोळक्याने त्याचे अपहरण करुन त्याला डोंगराच्या भागात नेले आणि बांबू आणि लाकडाने बेदम मारहाण केली होती.  त्यातून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख अजूनही कमी झालेला नाही हे स्पष्ट होतं. 18 वर्षाच्या मुलांच्या गटाने ज्या प्रकारे मारहाण केली, ते दृश्य पाहून संताप येतो.

सीमेपलीकडील दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणारे भारतीय लष्कराचे ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानसाठी धडकी भरवणारे ठरले होते. आता त्याच धर्तीवर बीडमध्येही अशी कठोर कारवाई व्हावी, जेणेकरून गुंडांचे कंबरडे मोडले जाईल, अशी भावना दामानिया यांनी व्यक्त केली आहे.

दमानिया यांनी केलेल्या या मागणीमुळे नवी चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्या या मागणीला समाजमाध्यमांवर मोठा प्रतिसाद मिळत असून, काहींनी त्यांची ही मागणी रास्त असल्याचे म्हटलं आहे. बीडमधील गुंडगिरीचे वास्तव पाहता आता कठोर उपाय योजनांची नितांत गरज असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातूनच दमानिया यांनी अशा स्वरुपाची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT