
Fadnavis Government : सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आता आयोगाने तयारी सुरु केली आहे. राज्याच्या शहरी आणि ग्रामीण विकास विभागांना पत्र पाठवून प्रभाग पुनर्रचना प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत.
नगरविकास विभाग आणि ग्रामीण विकास विभागाच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रात, आयोगाने 40 दिवसांमध्ये प्रभाग पुनर्रचना प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. राज्य सरकारने ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, राज्य निवडणूक आयोग मतदार याद्या आणि मतदान प्रक्रिया सुरु करेल, आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
महाराष्ट्रात, पुढील चार महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे मिनी-विधानसभा निवडणुका म्हणून ओळखल्या जात आहेत. यात सर्व 36 जिल्ह्यांमधील एकूण 687 ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकीचे धूमशान पार पडणार आहे.
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या जालना आणि इचलकरंजी महापालिकेसह सर्व 29 महानगरपालिकांवर सध्या प्रशासक आहेत. याशिवाय महाराष्ट्रात एकूण 248 नगरपरिषदा आहेत, इथेही सर्व ठिकाणी प्रशासक राज आहे. सोबतच 147 नगरपंचायतींपैकी 42 नगरपंचायती प्रशासकांमार्फत चालवल्या जात आहेत. आता या सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंयातींच्या निवडणुका होणार आहेत.
ग्रामीण भागात 34 जिल्हा परिषदांपैकी 32 जिल्हा परिषदांमध्ये प्रशासक आहेत. भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांचा कार्यकाळ मे 2027 मध्ये संपणार आहे. सोबतच एकूण 351 पैकी 336 मध्ये पंचायत समित्यांमध्ये प्रशासक आहेत. इथेही निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे पुढील चार महिने महाराष्ट्रात ऐन पावसाळ्यात राजकारण तापणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.