
Shashi Tharoor News : पाकिस्तान विरोधातील शस्त्रसंधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. भारताची ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादा विरोधातील भूमिका जगाला सांगण्यासाठी भारताच्या खासदारांचे शिष्टमंडळ परदेशी दौऱ्यावर पाठवले जाणार आहेत. सर्वपक्षांचे खासदारांचा समावेश यामध्ये असणार आहे. त्यासाठी पक्षांनी आपल्या खासदारांची नावे देखील दिली आहेत.
मागील काही दिवासंपासून भाजपशी जवळीक साधत असल्याची चर्चा काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्यावर होत आहे. भाजपने थरूर यांना परदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळात सहभागी होण्यासाठी संपर्क देखील केला होता. मात्र, काँग्रेसकडून शिष्टमंडळात सहभागी होण्यासाठी चार खासदारांची यादी दिली आहे त्यामध्ये थरूर यांचा समावेश नव्हता.
काँग्रेसने थरूर यांना डावलले असले तरी मात्र परदेशी जाणाऱ्या शिष्टमंडळामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्रालयाकडून जी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या यादीमध्ये काँग्रेसपक्षाकडून शशी थरूर यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसने जरी थरूर यांच्या नावावर फूली मारली तरी पंतप्रधान मोदींनी मात्र त्यांना संधी दिल्याची चर्चा आहे.
काँग्रेसने शशी थरूर यांच्या नावाची शिफारस न करता त्यांचा परदेशी जाणाऱ्या शिष्टमंडळात समावेश करण्यात आला. त्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटरवरून सांगितले की, काल सकाळी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांशी संवाद साधला. पाकिस्तानमधून होणाऱ्या दहशतवादासंदर्भात भारताची भूमिका परदेशात मांडण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या शिष्टमंडळासाठी काँग्रेसकडून ४ खासदारांची नावे मागवण्यात आली. आमच्या पक्षाकडून माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, लोकसभा उपनेते गौरव गोगोई, राज्यसभा खासदार डॉ. सय्यद नसीर हुसेन, लोकसभा खासदार राजा बरार यांनी नावे आम्ही सूचवली होती, असे सांगितले.
शशी थरूर - काँग्रेस
सुप्रीम सुळे - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
श्रीकांत शिंदे - शिवसेना
रविशंकर प्रसाद -भाजप
बैजयंत पांडा - भाजप
संजय कुमार झा- जेडीयू
कनिमोळी करुणानिधी - डीएमके
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.