Imtiaz Jaleel On VBA News Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel On VBA : इम्तियाज वंचितसोबत जाण्यास उत्सुक; आंबेडकरांनी सांगितले दरवाजे बंद...

Marathwada Political News : महाराष्ट्रात वंचितसोबतची युती तुटल्यापासून एमआयएम नव्या मित्राच्या शोधात आहे.

Jagdish Pansare

AIMIM Political News : प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती करत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचा महाराष्ट्रातील एकमेव खासदार निवडून आला. (AIMIM-VBA News)छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीला धक्का देत एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी मिळवलेला विजय ऐतिहासिक ठरला, पण ज्या वंचितमुळे हे शक्य झाले, त्या प्रकाश आंबेडकरांनी विधानसभा निवडणुकीत एमआयएमसोबतची युती तोडली.

त्यानंतर एमआयएमकडून अनेकदा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला गेला, पण त्यांनी तो झिडकारला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी पुन्हा एकदा वंचितसोबत आम्ही एका पायावर जायला तयार आहोत, असे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. यावर प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमचा हा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारत त्यांच्यासाठी आपले दरवाजे बंद असल्याचे निक्षूण सांगितले.

एमआयएमसारखा (AIMIM) मूर्ख पक्ष दुसरा नाही, असा संतापही आंबेडकरांनी व्यक्त केला. वंचितसोबत असल्याशिवाय छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात दुसरा विजय शक्य नाही, याची जाणीव एमआयएम आणि इम्तियाज जलील यांना आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत मैत्रीसाठी इम्तियाज यांनी अनेकदा पुढाकार घेतला. परंतु आंबेडकरांनी एमआयएमच्या या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करत नवे पर्याय शोधले.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आंबेडकरांनी युतीचा निर्णय घेत सगळ्याच राजकीय पक्षांना धक्का दिला. आता `इंडिया`मध्ये सहभागी होण्यासंदर्भात वंचितचे प्रयत्न सुरू आहेत. इकडे एमआयएमने पुन्हा आंबेडकरांना साद घालणे सुरू केले आहे. खासदार तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी एका मुलाखतीत या संदर्भात भाष्य केले.

आंबेडकरांची ताकद मान्य करतानाच आम्ही त्यांच्यासोबत जाण्यासाठी एका पायावर तयार असल्याचे इम्तियाज म्हणाले. पण याला प्रतिसाद न देता प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमसाठी आपले दरवाजे बंद झाले आहेत, असे बजावत हा पक्ष मूर्ख असल्याचे म्हटले आहे. मुस्लिम उमेदवाराला हिंदू मतदान करत नाही, असा दृष्टिकोन छत्रपती संभाजीनगरच्या गेल्या लोकसभा निवडणुकीत खोटा ठरला.

पाच मुस्लिम उमेदवार असतानाही ५० हजार हिंदूंनी इम्तियाज जलील यांना मतदान करून निवडून आणले. हा संदेश संपूर्ण देशात पोहाेचवणे गरजेचे होते; पण एमआयएमला ते करता आले नाही, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. त्यांच्या या परखड भूमिकेमुळे एमआयएम-वंचित ही गेल्या लोकसभा निवडणुकीत झालेली युती आता पुन्हा शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रात वंचितसोबतची युती तुटल्यापासून एमआयएम नव्या मित्राच्या शोधात आहे. लोकसभा निवडणूक सहा-सात महिन्यांवर आलेली असताना एमआयएमचा शोध काही संपलेला नाही. त्यातच जुन्या मित्राने झिडकारल्यामुळे या पक्षासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT