Marathwada Political News : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक उद्या, रविवारी (ता. आठ) होत आहे. माजी मुख्यमंत्री आणि काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नवा अध्यक्ष ठरवला आहे. (Nanded News) उद्याच्या निवडणुकीत ऐनवेळी बंद पाकिटातून त्याचे नाव संचालकांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे. शहरातील एका हाॅटेलमध्ये झालेल्या संचालकांच्या बैठकीत अध्यक्ष कोण असेल, यावर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती आहे.
जिल्हा बॅंकेचा अध्यक्ष ठरवण्यासाठी तीन दिवसांपूर्वीच बैठक पार पडली. अध्यक्षपदासाठी माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, गोविंदराव शिंदे नागेलीकर, बाळासाहेब रावनगावकर या तीन संचालकांची नावे चर्चेत आहेत. (Ashok Chavan) आता या तिघांपैकी कोणाचे नाव चव्हाणांकडून बंद पाकिटात पाठवले जाणार, हे रविवारी होणाऱ्या विशेष सभेत स्पष्ट होईल.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत (Congress) काँग्रेसप्रणित आघाडीला स्पष्ट बहुमत असल्याने माजी आमदार वसंतराव चव्हाण अध्यक्ष झाले होते. (Marathwada) तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे हरिहरराव भोसीकर होते. अडीच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर वसंतराव चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले आहे.
या रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात येत आहे. संचालकांचे मत जाणून घेण्यासाठी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत संचालकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला काँग्रेसचे सर्व संचालक उपस्थित होते. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात काॅंग्रेसचे १३, राष्ट्रवादीचे ५, शिवसेनेचा एक तर भाजपचे दोन असे संख्याबळ आहे.
अध्यक्षपदासाठी उत्सुक असलेल्या संचालकांनी जोरदार फिल्डिंग लावली असली तरी निवडीच्या वेळी कोणाच्या नावाने बंद लिफाफ्यात येईल, त्यावरच नवा अध्यक्ष ठरणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका पाहता अशोक चव्हाण तीन इच्छुकांपैकी कोणाला झुकते माप देणार हे पाहावे लागेल.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.