Mp Imtiaz Jaleel News Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel News : पोलिसांच्या नाकात दम आणतो की नाही बघाच; इम्तियाज यांचा इशारा

Imtiaz Jaleel On Drugs : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे नशेखोरीच्याविरोधात आक्रमक झाले आहेत...

जगदीश पानसरे

AIMIM News : छत्रपती संभीजानगर शहरात नशेखोरी आणि त्यातून गॅंगवाॅर, तरुणांवर जीवघेणे हल्ले करण्याचे प्रकार वाढले आहेत. काल अशाच नशेखोरीच्या प्रकरणातून एका अठरावर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या नशेखोरीच्याविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारण्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला. Imtiaz Jaleel यांच्या नेतृत्वाखाली शहरातील आमखास मैदानावर सुरू असलेल्या आय जे महोत्सवात नशेखोरी विरोधात लढण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इम्तियाज जलील स्वतः याविरोधात आक्रमकपणे सातत्याने भूमिका मांडत आहे. आय जे महोत्सवाला उपस्थित तरुणांसमोर बोलताना काल इम्तियाज यांनी शहरातील तरुणांच्या खुनाचा उल्लेख करीत नशेखोरीच्याविरोधातील लढ्यात उतरण्याचे आवाहन केले. अठरा वर्षांच्या तरुणाला चाकूने भोसकून त्याची हत्या करण्यात आली. आमच्या डोळ्यासमोर तरुणांचे मुडदे पडत आहेत, असे जलील म्हणाले.

शहराला विशेषतः तरुणांना नशेखोरीची विळखा पडत असताना आपल्याला शांत बसून चालणार नाही. आय जे महोत्सव केवळ क्रिकेट किंवा इतर स्पर्धांच्या आयोजनासाठी नाही. तर या शहारतील तरुणांना नशेखोरीपासून मुक्त करण्यासाठीचा लढा हा या आयोजनामागचा हेतू आहे. दिवसाढवळ्या नशेखोरीतून आपल्या तरुणांचे मुदडे पडत असतील तर आम्ही ते उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मी अनेकदा पोलिसांना प्रत्यक्ष भेटून या विषयावर गांभीर्याने कारवाई करण्याची मागणी केली होती. पण पोलिसांनी हा विषय फारसा गंभीरपणे घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे आता आपल्यालाच रस्त्यावर उतरून नशेखोरीच्याविरोधात लढावे लागेल. मला यासाठी तुमची साथ हवी आहे. तुम्ही माझ्यासोबत या मग बघा मी पोलिसांच्या कसे नाकात दम आणतो, असा इशाराही इम्तियाज यांनी दिला. 22 जानेवारी रोजी आय जे महोत्सव संपणार आहे. त्यानंतर नशेखोरीच्याविरोधात मी काय करतो? ते बघाच, असेही इम्तियाज जलील म्हणाले.

edited by sachin fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT