Imtiaz Jalil Vs Bhagwat Karad: 'आय जे' महोत्सवाला भाजपकडून 'नमो, चषकाने प्रत्युत्तर

Chhatrapati Sambhajinagar: दोन प्रतिस्पर्धी मैदानात उतरल्याचे चित्र आहे.
Imtiaz Jalil Vs Bhagwat Karad
Imtiaz Jalil Vs Bhagwat KaradSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे.छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी शहरातील आमखास मैदानावर 'आय जे'महोत्सवाचे आयोजन केले आहे. स्पोर्ट, फूड आणि इंटरटेनमेंट या थीमवर आधारित हा महोत्सव दोन आठवडे रंगणार आहे.

इम्तियाज जलील यांच्या या महोत्सवाला आता भाजपकडून 'नमो' चषक क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार डॉ. भागवत कराड हे या स्पर्धेचे आयोजक असल्याचे समजते. शहरातील विभागीय क्रीडा संकुलावर होणाऱ्या या नमो चषकाअंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Imtiaz Jalil Vs Bhagwat Karad
BJP News: ठाणे लोकसभा मतदारसंघावरील दाव्यानंतर BJP करणार जनसहभागातून 'जाहीरनामा' तयार

12 ते 20 जानेवारी दरम्यान हा नमो चषक होणार आहे. इम्तियाज जलील यांनी दुसऱ्या 'आय जे'महोत्सवाचे मोठ्या दिमाखात उद्घाटन केले. उत्कृष्ट नियोजन आणि भव्यदिव्य व्यवस्थेमुळे इम्तियाज जलील यांच्या महोत्सवाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इम्तियाज यांच्याकडून या महोत्सवाच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जात आहे.

इम्तियाज यांच्या या शक्ती प्रदर्शनाला आणि महोत्सवाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपही मैदानात उतरली आहे. भागवत कराड यांनी पुढाकार घेत नमो चषकाचा घाट घातल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगताना दिसते. लोकसभा निवडणुकीत इम्तियाज आणि कराड एकमेकांच्या विरोधात लढणार की नाही? हे लवकरच स्पष्ट होईल. तत्पूर्वी मात्र 'आय जे' आणि 'नमो' चषकाच्या निमित्ताने हे दोन प्रतिस्पर्धी मैदानात उतरल्याचे चित्र आहे.

Edited by: Mangesh Mahale

Imtiaz Jalil Vs Bhagwat Karad
Jitendra Awhad : आव्हाडांसाठी मुघल अन् अफझलखान हेच देव; श्रीराम कोण होते, ते त्यांना ज्ञात नसावे...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com