Nirmala Sitharaman | Imtiaz Jaleel | Dr Bhagwat karad Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel On Budget 2024 : 'निर्मला सीतारमण खोटं बोलत होत्या अन् राज्यमंत्री मागे बसून हसत होते...'

Interim Budget 2024 News : 2024 मध्ये भारतात आता 84 बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहेत ! किमती नियंत्रणात आणल्या! व्वा!, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी हे अर्थसंकल्पातील मुद्दे आहेत का? असा टोला लगावला.

Jagdish Pansare

Union Budget 2024 Updates: केंद्रातील भाजप सरकारचे शेवटचे आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर झालेले पहिले अंतरिम बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत मांडले. महिला सक्षमीकरणावर भर, शेतकऱ्यांना पीक विमा कवच देणारे, स्कील इंडियाच्या माध्यमातून तरुणांना प्रशिक्षण व इतर सवलती, पायाभूत सुविधांवर भर देणारे असे हे बजेट असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. पण, निर्मला सीतारमण खोटं बोलत असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. (Imtiaz Jaleel On Budget )

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) या संसदेत खोटं बोलत होत्या आणि आमचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड ( Dr Bhagwat karad) त्यांच्या मागे बसून हसत होते, असा आरोप करत खासदार जलील यांनी बजेटमध्ये देण्यात आलेल्या आश्वासनांची खिल्ली उडवली. बजेट मधील ठळक मुद्दे असा उल्लेख करत इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी आपल्या ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही जी-20 चे आयोजन केले, आम्ही तिहेरी तलाक पूर्ण केला, आम्ही रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा केली, 2010 मध्ये भारताकडे 20 बुद्धिबळ ग्रँडमास्टर होते, 2024 मध्ये भारतात आता 84 बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहेत ! किमती नियंत्रणात आणल्या! व्वा!, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी हे अर्थसंकल्पातील मुद्दे आहेत का? असा टोला लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या शिवाय आम्ही प्रधान मंत्री निवास योजने अंतर्गत 3 कोटी घरे बनवली, असा उल्लेखही अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला. पण तुमच्या उपमंत्र्यांच्या मतदारसंघात 2016 पासून एकाही घराचे बांधकाम सुरू झालेले नाही. डाॅ. भागवत कराड यांना त्यांच्या जिल्ह्यातील ही परिस्थिती माहिती आहे, अर्थमंत्री खोटं सांगत आहेत हे माहीत असूनही मागे हसत होते, असे म्हणत अर्थसंकल्पामधील आश्वासानांवर टीका केली.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT