Budget 2024 Updates : जय जवान-जय किसान... जय विज्ञाननंतर अन् आता मोदींचाही नवा नारा...

Budget 2024 Speech : निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अंतरिम बजेटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या घोषणेचा उल्लेख...
PM Narendra Modi, Nirmala Sitharaman
PM Narendra Modi, Nirmala SitharamanSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट भाषणामध्ये मोदी सरकारने मागील दहा वर्षांतील कामगिरीचे गुणगान गायले. संशोधन आणि नाविण्यता या क्षेत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष लक्ष असल्याचे सांगत सीतारमण यांनी नवा नाराही दिला. पंतप्रधान मोदींकडून देशातील संशोधनाला चालना दिली जात असून आता त्यांचा ‘जय अनुसंधान’ नारा असल्याचे सांगितले. (Budget 2024 Updates)

माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांनी ‘जय जवान, जय किसान’ नारा दिला होता. त्यानंतर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee ) यांनी त्यापुढे जय विज्ञान हा नारा जोडला. वाजपेयींनी विज्ञानाला प्राधान्य दिले. आता पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) जय अनुसंधान हा नारा दिला असल्याचे सीतारमण यांनी आपल्या भाषणात सांगितले. (Finance Minister Nirmala Sitharaman)

PM Narendra Modi, Nirmala Sitharaman
Union Budget 2024 Update : लांबलचक भाषणाचा रेकॉर्ड केलेल्या सीतारमण यांनी 57 मिनिटांतच का आटोपलं बजेट?

देशात संशोधन प्रकल्प उभारण्यासाठी एक लाख कोटींची निधी उभा केला जाणार आहे. लांबपल्ल्याच्या योजनांसाठी कमी किंवा शुन्य व्याजदराने निधी उपलब्ध करून देण्यासाठी त्याचा वापर केला जाईल. संशोधन आणि नाविण्यता क्षेत्रात अधिक योगदान देण्यासाठी खासगी क्षेत्राला प्रोत्साहित केले जाईल, असे सीतारमण यांनी बजेट भाषणात स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कररचनेत बदल नाही

अंतरिम बजेटमध्ये आयकर दात्यांना कोणतीच सूट देण्यात आलेली नाही. त्यामुळे नोकरदारांची निराशा झाली. मोदी सरकारने टॅक्सच्या स्लॅबमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. ज्यांचे उत्पन्न हे 7 लाखांपर्यंत आहे, ते उत्पन्न हे करमुक्त राहणार आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर रचनेमध्ये कोणतेच बदल न करता ते कर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. या अर्थसंकल्पात केवळ कॉर्पोरेट करामध्ये कपात करून तो 30 टक्के वरून 22 टक्के करण्यात आला आहे.

PM Narendra Modi, Nirmala Sitharaman
Union Budget 2024 : मोदींनी समुद्रकिनारी केलेल्या फोटोशुटचा ‘इम्पॅक्ट’ बजेटवरही...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com