Imtiaz Jaleel- Adarsha Civil Co-operative Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel News : पराभव झाला तरी इम्तियाज जलील यांनी 'आदर्श'च्या ठेवीदारांची सोडली नाही साथ !

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhaji Nagar News : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत संचालक मंडळाच्या भ्रष्ट कारभारामुळे झालेला तीनशे कोटीहून अधिकचा घोटाळा राज्यभर गाजला. हजारो ठेवीदारांच्या आयुष्यभराची पुंजी या पतसंस्थेत बुडाली. या धसक्याने काही ठेवीदारांचे निधन झाले तर काहींनी आपले जीवन संपवले.सैरभैर झालेल्या या ठेवीदारांच्या पाठीशी तेव्हा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ठामपणे उभे राहिले होते.

मंत्रीमंडळ बैठकीवर मोर्चा,थाळी बजाव, विभागीय आयुक्तालयावर मोर्चा, निदर्शने, सहकार निबंधक कार्यालयाला घेराव, अधिकाऱ्यांना धारेवर धरत पोलिस, सहकार खाते इम्तियाज जलील यांनी दणाणून सोडले होते.

लोकसभा (LOK SABHA) निवडणुकीत या ठेवीदारांची मते आपल्या मिळावी हा हेतू ठेवून इम्तियाज जलील त्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप विरोधकांकडून झाला.प्रत्यक्षात मात्र लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांचा पराभव झाला.

त्यांना आदर्शच्या ठेवीदारांची किती मते मिळाली, मिळाली की नाही? हे स्पष्ट नाही.पण पराभवानंतर या ठेवीदारांनी इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्या घरी जाऊन अक्षरशः टाहो फोडला होता. तेव्हा मी खासदार नसलो तरी तुमच्या कष्टाचा पैसा मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवेन, असा शब्द या ठेवीदाराना दिला होता.

तो त्यांनी खरा करून दाखवत लोकसभेतील पराभवानंतर या ठेवीदारांच्या पैशासाठी पुन्हा एकदा सहनिंबधक कार्यालयावर धडक दिली होती.संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत इम्तियाज जलील यांनी पुन्हा आक्रमक पावित्रा घेतल्याचे दिसून आले. लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून इम्तियाज जलील यांचा पराभव झाला.

महायुतीचे संदीपान भुमरे यांनी त्यांचा सव्वा लाखाच्या मताधिक्याने पराभव केला. हा पराभव एमआयएमच्या जिव्हारी लागला होता. त्यानंतर संभाजीनगर दौऱ्यावर आलेल्या एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी इम्तियाज जलील लोकसभेत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली होती. तसेच विधानसभेच्या तयारीला लागा असे आदेश दिले होते.

लोकसभा निवडणकीत शहरातील पुर्व,मध्य या दोन विधानसभा मतदारसंघात इम्तियाज जलील पहिल्या क्रमांकावर होते.त्यामुळे इम्तियाज हे पुन्हा मध्य मतदारसंघातून मैदानात उतरतील हे जवळपास स्पष्ट आहे. आदर्शच्या ठेवीदारांचा मुद्दा इम्तियाज यांनी त्यासाठीच पुन्हा हाती घेतला का? अशी चर्चा विरोधकांकडून केली जात आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT