AIMIM Political News Sarkarnama
मराठवाडा

AIMIM News : इम्तियाज जलील फडणवीसांची `बी टिम`, कादरींनी तोफ डागत दिला राजीनामा

Imtiaz Jalil is the 'B team' of Fadnavis : पक्षाच्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देताना कादरी यांनी इम्तियाज जलील यांच्यावर तोफ डागत त्यांना देवेंद्र फडणवीस यांचे हस्तक ठरवले. पत्रकारांशी बोलतांना कादरी यांनी अनेक गंभीर आरोप केले.

Jagdish Pansare

Maharashtra Assembly Election 2024 : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन चे (एमआयएम) कार्याध्यक्ष डॉ. अब्दुल गफ्फार कादरी यांनी मंगळवारी (ता. 22) राजीनामा असदुद्दीन ओवैसी यांच्याकडे पाठवला. एमआयएम भाजपाची `बी टीम` नसुन प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे देवेंद्र फडणवीस यांचे हस्तक बनले आहेत. मी औरंगाबाद पुर्व मतदार संघातून लढणार असून कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची त्यासंबंधात बोलणी सुरू आहे. इम्तियाज यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या किंवा माझ्या विरोधात उभे रहावे, असे आव्हान देत डॉ. अब्दुल गफ्फार कादरी यांनी एमआयएमच्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएममधील (AIMIM) गटबाजी समोर आली होती. पक्षाचे कार्याध्यक्ष कादरी यांनी माजी खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप करत वेगळा निर्णय घेण्याचे आधीच सांगितले होते. त्यानूसार पक्षाच्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देताना कादरी यांनी इम्तियाज जलील यांच्यावर तोफ डागत त्यांना देवेंद्र फडणवीस यांचे हस्तक ठरवले. पत्रकारांशी बोलतांना कादरी यांनी अनेक गंभीर आरोप करत इम्तियाज जलील यांना टार्गेट केले.

इम्तियाज जलील यांनी स्वतःला मोठे करण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीस यांना मदत व्हावी म्हणून गेल्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सोबतची युती तोडली. ज्यांच्यामुळे मोठे झाले त्यांचा त्यांना विसर पडला. माझे राजकीय नुकसान करण्याचा इम्तियाज जलील यांनी कायम प्रयत्न केला. असदुद्दीन ओवैसी यांची हैदराबाद येथे भेट घेवून तीन ते पाच मिनिट बोलण्याचा मी प्रयत्न केला. मात्र, त्यांनी तेव्हा वेळ दिली नाही. त्यासंदर्भात मी सविस्तर पत्र पाठवून माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचे उत्तर मला मिळाले नाही.

2014 मध्ये पुर्व मतदारसंघात 60 हजार तर 2019 मध्ये 80 हजाराहून अधिक मते मिळाली. थोड्या मतांनी मी पराभूत झालो होतो. त्यावेळी (Imtiaz Jaleel) इम्तियाज जलील यांनी कार्यकारणी बरखास्त केली, त्याचा मला फटका बसला. हे वेळोवेळी मी पक्षाध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले. सविस्तर पत्र पाठवून कळवले, पण त्याची दखल पक्षाच्या नेतृत्वाने घेतली नाही, असा आरोप गफ्फार कादरी यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक असलेल्या अतुल सावे यांना मदत करण्यासाठी प्रबळ उमेदवाराला डावलून कुमकूवत उमेदवार देण्याचा इम्तियाज जलील यांचा प्रयत्न आहे.

कार्याध्यक्ष असलेल्या माणसाला जर पक्षाध्यक्ष पाच मिनीट वेळ देत नसेल तर मी नेमलेल्या कार्यकर्त्यांना न्याय कोण देईल, असा सवाल कादरी यांनी केला. मी उमेदवारीसाठी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे. कॉंग्रेसच्या निर्णयानंतरच पुढील भूमिका घेवू. पण, मी पुर्व मतदार संघातून लढणार हे निश्‍चित असल्याचे कादरी यांनी स्पष्ट केले. इम्तियाज जलील मॅन्युप्युलेटर, कट रचणारे आणि खोटारडे आहेत.

फडणवीसांच्या नेतृत्वात ते एमआयएम पक्ष चालवत आहेत. लोकसभेत मराठा क्रांती मोर्चा विरोधात त्यांनी विधान केले. हायकोर्टात आरक्षाविरोधात याचिका दाखल केली. आता ते जरांगे पाटील यांच्या कडे जात आहेत. मनोज जरांगे पाटील चांगले मनुष्य आहेत ते हे सर्व ओळखून आहेत, असे म्हणत कादरी यांनी इम्तियाज जलील यांच्याविरोधात संताप व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT