Dhananjay Munde  Sarkarnama
मराठवाडा

Beed News : कृषी मंत्र्यांच्या परळीत मिळेना पूर्णवेळ तहसिलदार ; दोन महिन्यात चार...

Dhananjay Munde Beed News : महसूलमधील तालुका स्तरावरील सर्वात महत्वाचे पद म्हणजे तहसिलदार.

सरकारनामा ब्यूरो

Dhananjay Munde News : महसूलमधील तालुका स्तरावरील सर्वात महत्वाचे पद म्हणजे तहसिलदार. त्यांच्याच माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत पोचतो. मात्र, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीला पुर्णवेळ तहसिलदार मिळेना झालाय. संगीत खुर्चीच्या खेळात सामान्यांचे हाल होत असून दोन महिन्यांत या खुर्चीने चार तहसिलदार पाहीले आहेत.

खरीप हंगामात तीन हजार शेतकऱ्यांची सातबारा दुरुस्ती, विविध अनुदानही डिजीटल स्वाक्षरी अभावी रखडले आहे. या चार पैकी कोणत्यात तहसिलदारांनी डिजिटल स्वाक्षरी बनवली नसल्याने सातबारा दुरुस्तीचे काम रखडले. सुरेश शेजुळ गेल्यानंतर आईलनवाड यांनी काही दिवस कारभार पहिला व ते सेवानिवृत्त झाले.

त्यांच्यानंतर १० दिवस नायब तहसीलदार अविनाश निळेकर यांनी कार्यभार घेतला व ते ही बदलीने माजलगावला गेले. नंतर संदीप पाटील यांनी पदभार घेतला ते २५ दिवस राहिले. ते स्पर्धा परीक्षा पास झाल्याने पोलीस (Police) प्रशासनात रुजू होण्यासाठी नाशिकला ट्रेनिंगसाठी गेले. सध्या तहसीलदार श्री. पेंदेवाड यांनी १५ ऑगस्ट पासून पदभार घेतला आहे. मात्र, वरील पैकी कोणीच एक महिना सुध्दा कायम राहिले नसल्याने डिजिटल स्वाक्षरी बनवली नाही. यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून लवकरात लवकर शेतकऱ्यांची गैरसोय दुर करण्याची मागणी होत आहे.

येथील पुरवठा विभागातील डेटा एन्ट्री २०१४ पासून बंद असल्याची प्राथमिक माहिती आहे. सोबतच एपीएल, पीएचएच, एएवाय याबाबतीत अडचणी आहे. येथील पुरवठा विभागाबाबत संबंधित यंत्रणेला माहिती विचारल्यावर अडीच महिन्यात कोणीच कोणती माहिती देऊ शकत नाही. आम्हाला याबाबत काही माहिती नाही. कारण जबाबदार अधिकारी तहसील कार्यालयात कार्यरत नाहीत, असे सांगितले जाते.

गेल्या काही दिवसापासून राज्य शासनाच्या वतीने शासनाच्या योजना सर्व सामान्य नागरीकांपर्यत पोहचवणे व या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे या अभियानाचा उद्देश आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) व जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील शासन आपल्या दारी हा कार्यक्रम शहरातील हालगे गार्डन येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. मात्र, जर तालुक्याच्या मुख्य कार्यालयाची ही अवस्था असेल तर या अभियानाच्या मुळ उद्देशालाच मुंडे यांच्या होम ग्राऊंडवर हरताळ फासला जात असल्याची चर्चा नागरीकांमध्ये आहे. यामुळे शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दुर करण्याची मागणी होत आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT