Ahmednagar Crime : नगरचे आयएएस, आयपीएस अधिकारी सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर ! चक्क पोलीस अधीक्षकांच्या नावाने बनावट अकाऊंट...

SP Rakesh Ola News : चक्क पोलीस अधीक्षकांच्या नावाने बनावट अकाऊंट...
SP Rakesh Ola News
SP Rakesh Ola NewsSarkarnama

Ahmednagar Cyber Crime News : सायबर गुन्हेगारांची मजल दिवसेंदिवस वाढतच चालली की काय अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे. याचा प्रत्येय थेट नगरचे (Ahmednagar) जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना आला असून त्यांचे नाव आणि फोटो वापरून एका अज्ञाताने चक्क फेसबुक अकाऊंट उघडले. केवळ अकाऊंट तयार करून न थांबता या अज्ञाताने जिल्हा पोलीस अधीक्षक ओला यांच्या नावाने बनवलेल्या बनावट अकाऊंट वरून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. हा गडी इथेच न थांबता त्याने अनेकांना विविध कारणे सांगत पैशांचीही मागणी केली असल्याचे समोर आले आहे.

या बाबत खुद्द पोलीस (Police) अधीक्षक राकेश ओला यांनीच आपल्या मूळ फेसबुक अकाऊंट वरून आपल्या एफबी मित्रांना माहिती देत सावध केले. आणि याला कोणीही बळी पडू नये असे आवाहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली. दिवसेंदिवस सायबर क्राईम वाढत असून वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे घडत असल्याचे पुढे येत आहे.

SP Rakesh Ola News
Jalgaon politics : पक्ष कसा सांभाळायचा शरद पवारांकडून राऊतांनी शिकावे : गुलाबराव पाटलांचा टोला

यात एखाद्या प्रसिद्ध आणि नामांकित व्यक्तीच्या नावे बनावट सोशल (Social Media) अकाऊंट तयार करून त्याद्वारे पैसे लुबाडण्याचे प्रकार होत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, नगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे अशा आयएएस अधिकाऱ्यांच्या नावे बनावट सोशल अकाऊंट उघडली गेली.

SP Rakesh Ola News
Mangalwedha News : अजितदादांनी बशीर बागवान यांची केली आस्थेवाईकपणे विचारपूस : मंगळवेढ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा

याबाबत त्यांनी नगरच्या सायबर क्राईम ब्रँच कडे तक्रारही केली. आता चक्क आयपीएस अधिकारी असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या नावानेच बनावट सोशल अकाऊंट उघडून पैसे लुबाडण्याचा प्रयत्न होत असल्याचे पुढे आल्याने सायबर क्राईम नियंत्रणात आणणे एक मोठे आव्हान असल्याचेच पुढे येत आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com