Eknath Shinde-Vilas Bhumre News Sarkarnama
मराठवाडा

Paithan Assembly Constituency: पैठणमध्ये `एकनाथांची` पसंती भुमरेंनाच! मशाल-धनुष्यबाणाला भिडणार ?

Vilas Bhumare News: लोकसभेत मराठवाड्यात भुमरे यांनी विजय मिळवत महायुतीचे इभ्रत राखली. मराठवाड्यातील शिवसेनेच्या या एकमेव विजयाने मुख्यमंत्री शिंदे यांचे वजन आणखी वाढले. त्यामुळे पैठणमधून विलास भुमरे यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित होते.

Jagdish Pansare

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या पैठण विधानसभा मतदारसंघात खासदार पुत्र विलास भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या आधा सहा वेळा शिवसेनेकडून संदीपान भुमरे यांनी या मतदारसंघात निवडणुक लढवली होती. पैकी पाच वेळा विजयी होत त्यांनी एकनाथांचे पैठण शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून दिले होते.

पंचवीस वर्ष विधानसभेत काम केल्यानंतर भुमरे यांना शिवसेनेने बढती देत छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेची उमेदवारी दिली. तिथेही पहिल्याच प्रयत्नात भुमरेंनी विजयाचा झेंडा फडकवला.

मराठवाड्यात महायुतीचे दिग्गज गारद होत असताना सरकारविरोधातील लाटेतही भुमरेंनी छत्रपती संभाजीनगरची जागा जिंकत बाजी मारली होती. (Paithan) भुमरेंच्या लोकसभा लढवण्यामागे पैठण विधानसभेची जागा मुलगा विलास याच्यासाठी मोकळा करणे हा प्रमुख उद्देश होता. तसा शब्दत भुमरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळवला होता. शिवाय लोकसभेत मराठवाड्यात भुमरे यांनी विजय मिळवत महायुतीचे इभ्रत राखली.

मराठवाड्यातील शिवसेनेच्या या एकमेव विजयाने मुख्यमंत्री शिंदे यांचे वजन आणखी वाढले. त्यामुळे पैठणमधून विलास भुमरे यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित होते. त्यानूसार काल जाहीर झालेल्या शिवसेनेच्या पहिल्या यादीत विलास भुमरे यांना पैठणची उमेदवारी जाहीर झाली. आता प्रतिक्षा आहे ती महाविकास आघाडीतील कुठला घटक पक्ष भुमरेंशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरणार याची.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पैठणची जागा प्रतिष्ठेची केली आहे. संदीपान भुमरे यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचा बदला उद्धव ठाकरे यांना घ्यायचा आहे. (Shivsena) त्यामुळे पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी आहे. तर 2009 मध्ये शिवसेनेच्या संदीपान भुमरे यांना पराभूत करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) ने पुन्हा या मतदारसंघावर दावा केला आहे. अर्थात शिवसेना-भाजपच्या युतीमध्ये ही जागा कायम शिवसेनेने लढवलेली आहे.

पक्षात फूट पडल्यानंतरच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा मतदारसंघ सोडण्याची शक्यता तशी कमी आहे. आज-उद्या याबद्दलची स्पष्टता होईल. महायुतीतील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखील पैठणची जागा सोडवून घ्या, अशी मागणी राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडे केली होती. मात्र भाजपच्या पहिल्या यादीत जेव्हा पैठण मतदारसंघाचे नाव आले नाही, तेव्हाच या मागणीला फारसे महत्व देण्यात आले नाही हे स्पष्ट झाले होते.

कामाला लागा, असे आदेश प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या संभाव्य उमेदवाराला दिले होते. त्यानूसार विलास भुमरे यांनी पैठणमध्ये तयारी सुरू केली होती. काल एकनाथ शिंदे यांनी पैठणमधून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. लोकसभा निवडणुकीत संदीपान भुमरे यांचा विजय झाल्याने पैठणमधील शिवसैनिकांचा आत्मविश्वास वाढला आहे. विरोधक विलास भुमरे यांच्याविरोधात कसा डाव टाकतात? यावर पैठणमध्ये मशाल आणि धनुष्यबाण यांच्यातील लढत चुरसीची होणार की एकतर्फी? हे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT