Paithan Assembly Constituency 2024 : भुमरेंनी तीस वर्ष राखले पैठण, मुलाला आव्हान पेलवणार का ?

Uddhav Sena will fight with Bhumren in Paithan : शिवसेनेत फूट पडल्यानंतरची पहिली विधानसभा निवडणूक होणार असल्याने याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने स्वबळावर नऊ खासदार निवडून आणत ताकद दाखवली.
MP Sandipan Bhumre News
MP Sandipan Bhumre NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena v/s Shivsena News : गेल्या तीस वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विधानसभेच्या पैठण मतदारसंघाच्या लढतीकडे यंदा संपुर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. नुकतेच लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून निवडून गेलेले संदीपान भुमरे यांनी 1990 पासून 2009 चा अपवाद वगळता पाच टर्म पैठणमधून विजय मिळवला. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला.

या सरकारमध्ये संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोजगार हमी व फलोत्पादन खात्याचे कॅबिनेट मंत्री केले. अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडात भुमरेही सहभागी झाले. उद्धव ठाकरेंची सत्ता गेल्यानंतर महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी पुन्हा भुमरेंकडे आधीच्या खात्याचा पदभार दिला. शिवाय संभाजीनगरचे पालकमंत्री पदही दिले.

महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या भुमरे यांना संभाजीनगरमधूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेची उमेदवारी दिली. मराठवाड्यात महायुतीचे दिग्गज उमेदवार पराभूत होत असतांना भुमरे यांनी मात्र अनपेक्षितपणे विजय मिळवला. या विजयाने मराठवाड्यात आणि राज्यात शिवसेनेची पत वाढली. मंत्रीपदाचा राजीनामा देत भुमरे यांनी लोकसभा लढवण्याची तयारी दाखवली ती पैठणमधून मुलगा विलास भुमरे याच्या उमेदवारीच्या शब्दावर.

MP Sandipan Bhumre News
MP Sandipan Bhumre : वाईन शाॅप नियमाने, शुल्क भरून घेतले ; आरोप करणारे खोटारडे..

शिवसेनेत फूट पडल्यानंतरची पहिली विधानसभा निवडणूक होणार असल्याने याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाने स्वबळावर नऊ खासदार निवडून आणत आपली ताकद दाखवून दिली. आता विधानसभेत विशेषतः पक्ष सोडून गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात मशाल पेटवून धक्का देण्याच्या तयारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे. संदीपान भुमरे यांनी तीस वर्ष राखलेला पैठण विधासभेचा बालेकिल्ला आता त्यांच्या मुलाला राखता येतो का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

भुमरे यांनी पैठणमधून सहा वेळा निवडणूक लढवली, पैकी पाच वेळा ते विजयी झाले. तर 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय वाघचौरे यांनी त्यांचा पराभव केला होता. 1990 मध्ये बबनराव वाघचौरे यांच्या रुपाने शिवसेनेला पैठणचा पहिला आमदार मिळाला होता. त्यानंतर 1995 ते 2019 अशा सलग सहा निवडणुकीत शिवसेनेने संदीपान भुमरे यांनाच उमेदवारी दिली. 2004 मध्ये अपक्ष सुनील शिंदे यांनी संदीपान भुमरे यांना चांगलाच घाम फोडला होता. अवघ्या पाच हजारांच्या फरकाने भुमरे विजयी झाले होते.

MP Sandipan Bhumre News
Uddhav Thackeray : 'भाजपला दाढीवाला डिंक्या आणि गुलाबी आळी लागली', उद्धव ठाकरेंनी तोफ डागली

त्या पुढच्या म्हणजेच 2009 च्या निवडणुकीत भुमरे यांच्या पराभवाला सुनील शिंदे यांची उमेदवारीच कारणीभूत ठरली होती. राष्ट्रवादीच्या वाघचौरे विरुद्ध भुमरे लढतीत मनसेकडून लढलेल्या सुनील शिंदे यांनी पंचवीस हजार मते घेतली. मत विभाजनाचा फटका भुमरे यांना बसला आणि त्यांचा पराभव झाला. 2014 मध्ये देशात आणि राज्यात मोदी लाट होती, त्यामुळे भाजपने युतीऐवजी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.

भुमरे यांच्याविरोधात भाजपने ऐनवेळी विनायक हिवाळे यांना उमेदवारी दिली. तीस हजार मते त्यांना मिळाली तरी भुमरेंनी 25 हजारांच्या फरकाने विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत भुमरे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी गेलेल्या दत्ता गोर्डे यांचा पराभव केला. वंचित, एमआयएमने निर्णायक मते घेतल्यानंतरही भुमरे 14 हजार मतांनी निवडून आले. पैठणमधून भुमरे यांच्या पाच वेळा निवडून येण्याला शिवसेनेची हवा कारणीभूत होती की भुमरेंनी केलेली विकासकामे ? हा वादाचा विषय ठरू शकतो.

MP Sandipan Bhumre News
Paithan Political News : भावी आमदार म्हणत छोट्या भुमरेंचा वाढदिवस जोरात..

उध्दव सेना खेटणार अन् भिडणार..

वडिलांकडून राजकारणाचे बाळकडू घेतलेल्या विलास भुमरे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणाला सुरुवात केली. बांधकाम सभापती, भुमरेंच्या पालकमंत्री पदाच्या काळात सगळा कारभार त्यांनीच पाहिला. आता पैठणमधून आमदार होण्यासाठी ते गुडघ्याला बांशिग बांधून आहेत. तर दुसरीकडे संदीपान भुमरे यांनी केलेल्या गद्दारीचा वचपा काढण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष योग्य संधीची वाट पहात आहे.

भुमरे पिता-पुत्राचे वर्चस्व शिवसेनेमुळेच होते हे दाखवून देण्यासाठी ठाकरे पिता-पुत्रांनी पैठणवर लक्ष केंद्रीत केले आहे. पक्ष फुटल्यानंतर दोन्ही ठाकरे व त्या पक्षाच्या नेत्यांनी पैठणमध्ये दौरे करत वातावरण निर्मिती केली आहे. भुमरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करत हल्ला चढवल्यानंतर प्रत्यक्ष उमेदवार जाहीर झाल्यानंतर आरोपाची धार अधिक तेज होणार आहे. अशावेळी पैठणचा मतदारसंघ राखण्याचे शिवधनुष्य भुमरेंच्या मुलाला पेलवणार का? हा खरा प्रश्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com