Pankaja Munde, Dhananjay Munde Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde : मुंडे भाऊ - बहीण एकाच व्यासपीठावर; हा तर माझ्यासाठी आनंदाचा क्षण...

Munde brothers - sisters on the same platform : परळी वैजनाथ येथे बाजीराव धर्माधिकारी यांनी आयोजित केलेल्या ब्राह्मण ऐक्य परिषदेला दोघांची हजेरी

Prasad Shivaji Joshi

Parli Vaijnath News : आम्ही बहीण आणि भाऊ एकाच व्यासपीठावर येणे ही नियतीची इच्छा होती आणि मुंडे परिवारातील सर्वात वडील पुरुष म्हणून हा माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण आहे, असे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी वैजनाथ येथे केले. परळी वैजनाथ येथे बाजीराव धर्माधिकारी यांनी आयोजित केलेल्या ब्राह्मण ऐक्य परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची उपस्थिती होती.

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनीही यावेळी राजकीय फटकेबाजी केली. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा उल्लेख लाडकी बहीण असा केला. तसेच पुढे बोलताना सांगितले की, आता उत्साहाने काम करण्याची वेळ आहे. आम्हा दोघांना एकत्र व्यासपीठावर बघून अनेकांना उत्साह येणार आहे.

माझेही पंचांग आता चांगले होईल...

भाजपच्या राष्ट्रीय सचिव यांना पक्षात नेहमी डावलले जात असल्याचे बोलले जाते. पंकजा मुंडे यांच्या भाषणातूनही अनेकदा अशा प्रकारचे वक्तव्य केले जाते. हा धागा पकडून पंकजा मुंडे यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पंचांगकर्ते मोहन दाते यांचा उल्लेख करताना सांगितले की, त्यांचा सत्कार करण्याचा योग आल्यामुळे आता माझेही पंचांग चांगले होईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंडे घराण्यातील राजकीय वैर बीडवासियांनी जवळून पाहिले आहे. या घराण्यात पुन्हा मनोमिलन व्हावे, अशी अनेकांची इच्छा होती. दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवारांच्या माध्यमातून महायुतीत सामील झाली आणि त्यातून धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांच्या भाजप पक्षाचे मित्रपक्ष झाले. त्यामुळे हे मनोमिलन पहावयास मिळाले असल्याची चर्चा अनेक कार्यकर्त्यांमध्ये सुरु होती.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT