Beed, 09 March : (स्व.) गोपीनाथ मुंडे यांच्या घरात वाल्मीक कराड हा साफसफाई करणारा घरगडी म्हणून आला होता. मात्र, गोपीनाथ मुंडे आणि टी. पी. मुंडे यांच्या कॉलेजच्या राजकारणात गोळीबार झाला. त्यात एक गोळी वाल्मीक कराडच्या पायाला लागली आणि तो वाचला. मुंडेंना वाटलं आमच्यासाठी वाल्मीकने एक गोळी खाल्ली, त्यामुळे त्यांनी त्याला जवळ केले. पण तो मालकच झाला, पुढे धनंजय मुंडेंनी त्याच्याकडे सर्व काही सोपवले, असे आमदार सुरेश धस यांनी वाल्मीक कराडच्या राजकीय, सामाजिक जन्माची कहाणी सांगितली.
आमदार धस म्हणाले, वाल्मीक कराड (Walmik Karad) हा गोपीनाथ मुंडे यांच्या घरी साफसफाई करणारा घरगडी म्हणून आला होता. गोपीनाथ मुंडे आणि टी. पी. मुंडे यांच्या कॉलेजच्या राजकारणात गोळीबारीची घटना घडली होती. त्या घटनेत एक गोळी वाल्मीक कराडच्या पायाला लागली. त्या वादात गोळीबार झाला, सुदैवाने ती वाल्मीक कराडच्या पायाला लागली आणि तो वाचला.
या गोळीबारीच्या घटनेमुळे वाल्मीक कराड हा गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या घरात गेला. गोपीनाथ मुंडेंनाही वाटलं की व्वा, व्वा, वाल्मिक कराड याने आमच्यासाठी एक गोळी खाल्ली, ये जवळ. त्या घटनेनंतर वाल्मीक कराड हा गोपीनाथ मुंडे यांच्या जवळ गेला. त्या वेळी गोपीनाथ मुंडे आणि पंडितअण्णा मुंडे एकत्र होते, असेही धस यांनी नमूद केले.
ते म्हणाले, पुढे काही काळानंतर गोपीनाथ मुंडे आणि त्यांचे बंधू पंडितअण्णा मुंडे हे वेगळे झाले. तो दोघे वेगळे झाल्यानंतर वाल्मीक कराड हा पंडितअण्णा मुंडे यांच्याकडे गेला. तसं तो पंडितअण्णा यांचं सांभाळत राहिला. तसंही गोपीनाथ मुंडे आणि पंडितअण्णा मुंडे हे वेगळे नव्हते, दोन्ही भावांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम होते. पण वाल्मीक कराड हा पुढे धनंजय मुंडे यांच्या बाजूने राहिला.
वाल्मीक कराड हा घरगडी म्हणून मुंडे कुटुंबीयांकडे आला होता. घरातील साफसफाई आणि इतर किरकोळ कामे करणे हे त्याचं कामं होतं. पण मुंडेंनी वाल्मीक कराड या घरगड्याला मालक करून टाकलं. त्याला एवढा मोठा मालक केला की त्यांनी सगळ्यांचं त्याच्यावर सोपवून टाकलं. त्यामुळे तोही घरगड्याच्या विचारसरणीनुसार वागायला लागला. एखाद्या घरगड्याची लायकी शंभर रुपयांची असताना त्याला दहा लाख रुपये मिळाले तर तो काय करणार. तो दहा लाखांचे एक कोटी करण्याचाच प्रयत्न करणार ना, असा सवालही सुरेश धस यांनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.