Talathi arrest  Sarkarnama
मराठवाडा

Talathi arrest : 'भाऊसाहेबां'मध्ये खळबळ! ‘24 कोटी’च्या खेळाची पोलखोल; चार तलाठी कोठडीत, आतापर्यंत 24 अटक, प्रशासन हादरलं

Jalna Heavy Rain Grant Scam: Four Talathis Arrested in 24 Crore Fraud Case : जालना इथल्या अतिवृष्टी गैरव्यवहार प्रकरण राज्यात गाजत असून, पोलिसांनी यात एकाच वेळी चार तलाठ्यांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

Pradeep Pendhare

Jalna district corruption : अतिवृष्टी अनुदान वाटप गैरव्यवहार प्रकरणी जालना जिल्ह्यातील महसूल प्रशासन आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईने चांगलच हादरलं आहे.

अतिवृष्टी अनुदान गैरव्यवहार प्रकरणी पसार असलेल्या चार तलाठ्यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या चौघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. आतापर्यंत या प्रकरणात 24 संशयितांना अटक करण्यात आली आहे.

जालना (Jalna) जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यातील 240 गावांमध्ये 24 कोटी 90 लाख रुपयांचा अतिवृष्टी अनुदान गैरव्यवहार समोर आला होता. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात 28 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास आहे. यातील 18 संशयितांची अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकताच फेटाळला आहे.

जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यातील 240 गावांमध्ये 24 कोटी 90 लाख रुपयांचा अतिवृष्टी अनुदान गैरव्यवहार समोर आला होता. या प्रकरणी अंबड पोलिस (Police) ठाण्यात 28 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास आहे. यातील 18 संशयितांची अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकताच फेटाळला आहे.

न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने संशयित आरोपींची पोलिसांकडून धरपकड सुरू झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी एकाच वेळी चार तलाठ्यांना अटक केल्याने महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे. यात विनोद जयजयराम ठाकरे (वय 43, श्रीकृष्णनगर, अंबड रोड, जालना), कृष्णा दत्ता मुजगुले (35, ढालसखेडा, ता. अंबड), गणेश ऋषींदर मिसाळ (34, दुधना काळेगाव, ता. जि. जालना) आणि दिगंबर गंगाराम कुरेवाड (55, चौधरीनगर, जालना) या तलाठ्यांना शुक्रवारी अटक करण्यात आली.

या गैरव्यवहार प्रकरणात महसूल विभागातील काही अधिकारी अन् त्यांचे एजंट पसार आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांच्या शोधासाठी कारवाई सुरू आहे. हे संशयित स्वतःहून हजर न झाल्यास वेगवेगळे कायदेशीर मार्ग अवलंबण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.

काय आहे प्रकरण

जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अंबड व घनसावंगी तालुक्यातील याद्यांमध्ये सरकारच्या अनुदानाची रक्कम परस्पर लाटल्याच्या तक्रारी समोर आल्या. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रकरणात सत्यता पडताळणीसाठी चौकशी समिती गठीत केली होती.

चौकशी समितीचा अहवाल अन्...

चौकशी समितीने 240 गावांमध्ये 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांच्या सरकारी रकमेचा अपहार झाला असल्याबाबत अहवाल दिल्यानंतर सदर प्रकरणात पोलिस ठाणे अंबड इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक यांच्या आदेशान्वये आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT