Jalna farmers grant scam : जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटण्यात येणारे अतिवृष्टी आणि गारपीट अनुदान वाटपाचा घोटाळ्याबाबत भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी गंभीर आरोप केला.
हा घोटाळा तब्बल 100 कोटींच्या पुढे आहे, असा दावा आमदार लोणीकर यांनी केला. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना तुरुंगात डांबण्याची वेळ आल्याचेही आमदार लोणीकर यांनी म्हटले.
जालना जिल्ह्यात 2022 ते 2024 दरम्यान अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे (Farmers) प्रचंड नुकसान झाले. सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 412 कोटींचे अनुदान मंजूर केले. परंतु यापैकी शेतकरी दाखवून, दुबार अनुदान देऊन आणि सरकारी जमिनींच्या नावावर तलाठी, ग्रामसेवकांनी हे अनुदान लाटले.
जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या चौकशी समितीत, 26 तलाठी, 31 ग्रामसेवक, 17 कृषी सहाय्यक दोषी आढळले. जालना (Jalna) अंबड, घनसावंगी, भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यांमध्ये तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी संगनमताने हा घोटाळा घडवला आहे.
या घोटाळ्यावरून भाजप आमदार बबनराव लोणीकर चांगलेच आक्रमक झाले आहे. हा घोटाळा 100 कोटींच्या पुढे आहे, असा दावा त्यांनी केला आहे. या भ्रष्टाचाराच्या काळ्याकुट्ट गर्तेतून शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा परत मिळवण्यासाठी, भ्रष्टाचार करणाऱ्यांनी प्रशासनाला खड्ड्यात घेतलेच आहे. या दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन् पारदर्शक चौकशीची मागणी आमदार लोणीकर यांनी केली.
जालना इथं 14 जूनच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर आमदार लोणीकर यांनी या घोटाळ्यावर जाहीर भाष्य केले. “हा केवळ आर्थिक अपहार नाही, तर शेतकऱ्यांच्या विश्वासाचा आणि हक्काचा खून आहे. ज्या शेतकऱ्यांनी सर्वस्व गमावले, त्यांच्या तोंडचा घास हिरावणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना तुरुंगात डांबले पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
या घोटाळ्याची तात्काळ 'एसआयटी' किंवा 'सीबीआय' चौकशी झाली. घोटाळ्यात आढळलेल्या दोषींची मालमत्ता जप्ती आणि कठोर फौजदारी कारवाईसाठी आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही आमदार लोणीकर यांनी सांगितले.
दरम्यान, या घोटाळ्यात सुरवातीला 10 ग्राम महसूल अधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने मागील आठवडयात निलंबित केले. यानंतर कालपुन्हा 11 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. आतापर्यंत एकूण 21 जणांवर निलंबनाची कारवाई झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.