Jalna Lok Sabha : लोकसभेच्या जालना मतदारसंघासाठी 13 मे रोज मतदान पार पडले. पहिल्यांदा मतदारांनी मतांचा टक्का 70 टक्क्यांच्यावर नेला. मतांचा वाढलेला हा टक्का रावसाहेब दानवे यांच्या विकास कामांना पावती देणारा ठरणार? की मग परिवर्तनाची नांदी याचा फैसला चार जून रोजी होणार आहे. मतदानानंतर मतदारसंघात होणाऱ्या चर्चेने महाविकास आघाडीचे उमेदवार डाॅ. कल्याण काळे यांना झुकते माप दिले असले तरी रावसाहेब दानवे यांचे राजकारण आणि त्यांच्या प्रदीर्घ अनुभव पाहता त्यांचे समर्थक मात्र अब की बार दानवे दादा या दाव्यावर ठाम आहेत. या सगळ्या चर्चा आणि दाव्यांकडे फारसे लक्ष न देता महायुती आणि महाविकास आघाडीच्याMVA प्रमुख उमेदवारांनी घरी न थांबता दौरे सुरू केले आहेत.
कल्याण काळे kalyan kale यांनी जालना लोकसभा मतदारसंघात आभार दौरे सुरू करत त्यांच्यासाठी जीवापाड मेहनत घेणाऱ्या महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे Raosaheb Danve यांनी मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात स्वतःला झोकून दिले.
आज (शनिवारी) महाराष्ट्रातील शेवटच्या आणि देशातील पाचव्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. दानवे यांनी या दरम्यानच शिर्डी येथे जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. जालना लोकसभेसाठी मतदान पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दानवे यांनी राजूर येथे राजुरेश्वराचे दर्शन घेऊन कामाला सुरूवात केली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राजूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना काहीकाळ निवांत घालवता यावा यासाठी विविध पर्यटन पूरक प्रकल्प राजूरमध्ये हाती घेण्यात येत आहेत. याची पाहणी आणि आढावा घेतल्यानंतर दानवेंनी मुंबईत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला. दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी कल्याण काळे यांनी मात्र मतदानाच्या दुसऱ्या दिवशीपासून मतदारसंघात आभार दौरे सुरू करत महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी चर्चा केली. या आभार दौऱ्यातून झालेल्या मतदानाची आकडेवारी आणि विजयाचे गणित जुळते का? याचा अंदाज काळेंकडून घेतला जात असल्याचे समजते.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.