Modi Cabinet Meeting : मोदींच्या कॅबिनेट बैठका कशा होतात? गडकरींच्या ‘त्या’ किश्श्यासह माजी मंत्र्याने सांगितली इनसाईट स्टोरी

Arvind Sawant News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एक दोन वेळा बोललो. पण त्यांनाही त्यांनी पटाकनऽऽ उडवून लावलं. तेव्हा मला प्रचंड हर्ट झालं. चांगली सूचना येत असेल तर... पण, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये ‘सगळं काही मेरी मर्जी’ असंच असतं.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

Mumbai, 18 May : केंद्रीय कॅबिनेट बैठका कशा असतात? त्या कशा चालतात?, मोदी इतर मंत्र्यांना बोलू देतात का? याची चर्चा कायम होत असते. त्यांच्याच मंत्रिमंडळात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे अवजड उद्योगमंत्री होते. त्या काळात त्यांना केंद्रीय कॅबिनेट बैठकांचा आलेला अनुभव त्यांनी कथन केला आहे. केंद्रीय कॅबिनेट बैठकींमध्ये सचिव नसतात. बहुतांश बैठकांमध्ये कोणीही बोलत नाही. कलम ३७० हटवताना ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडले होते आणि आमच्या कारकिर्दीतील ती सर्वांत हसत खेळत झालेली केंद्रीय कॅबिनेट बैठक हेाती, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री तथा शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय कॅबिनेट बैठकांची इनसाईट स्टोरी सांगितली.

राज्यातील कॅबिनेटच्या बैठकांना (cabinet meeting) सचिव बसतात. पण, केंद्राच्या बैठकांना सचिव नसतात. त्या ठिकाणी फक्त मंत्री (Minister) बसतात. एखाद्या मंत्र्याला कायद्यात दुरुस्ती आणायची आहे किंवा नीती घोषित करायची आहे. त्या वेळी संबंधित मंत्री ती दुरुस्ती अथवा नीती मांडतो. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना ती अगोदरच माहिती असते. आम्हाला आदल्या दिवशी रात्री उशिरा कॅबिनेट बैठकीची नोट येते. ती वाचायला आम्हाला कधी कधी पहाट व्हायची, असेही अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी नमूद केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi
Solapur Politics : भाजपचे युवा नेते, माजी नगरसेवक देवेंद्र कोठेंच्या विरोधात गुन्हा दाखल

ते म्हणाले, बैठकीला मी पहिल्यांदा गेलो, त्यावेळी प्रथम प्रकाश जावडेकर भेटले. त्यांना विचारलं, ‘प्रकाश, बैठकीत बोलता येतं का हो.’ तेव्हा ते म्हणाले, ‘न बोललं बरं.’ थोड्या वेळाने नितीन गडकरी आले, त्यांना विचारलं तर ते म्हणाले, ‘अगदीच गरज असेल तर बोला.’ त्यानंतर मीर् ‘मौनम्‌ सर्वार्थ साधनम्‌’ या भूमिकेत राहिलो. पण, एक ते दोन वेळा त्यांनी मला कॅबिनेट बैठकीत बोलायला दिलं. उगीच मी खोटं बोलणार नाही.

जेव्हा केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी नवा कामगार कायदा आणला. त्या कामगार कायद्याला मी विरोध केला होता. त्यावेळी मोदी म्हणाले, क्या है सावंतजी. मी म्हणालो की, सर ये गलत होगा. इसका इम्पॅक्ट आणि सोशल इम्पॅक्ट बहुत गलत होगा. त्यावेळी मोदी म्हणाले, गंगवार सावंतजींसे बात करो, फिर दुबारा ये बिल लेके आव. फिर देखेंगे. मी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि कामगार कायदे आले. मी मंत्रिमंडळात होतो, तोपर्यंत ते कायदे येऊ शकले नाहीत. पण त्यांच्याच मनातच होतं ते कायदे आणण्याचे. पण, बैठकीत सर्वजण गप्प असतात. कोणीही बोलत नाही, असा दावाही सावंत यांनी केला.

Narendra Modi
Pawar-Tatkare News : पवारांचा मुक्काम असलेल्या हॉटेलला तटकरेंची भेट; अनिल देशमुखांचा दुजोरा

ते म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एक दोन वेळा बोललो. पण त्यांनाही त्यांनी पटाकनऽऽ उडवून लावलं. तेव्हा मला प्रचंड हर्ट झालं. चांगली सूचना येत असेल तर... पण, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये ‘सगळं काही मेरी मर्जी’ असंच असतं. त्यात कोणीच बोलत नाही. जेव्हा 370 कलम जम्मू काश्मीरमधून काढून टाकायचं होतं. तेव्हा ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडलं होतो. तो आमच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत सर्वांत आनंदाचा क्षण होता. तेवढीच एक कॅबिनेट मला हसत खेळत वाटली.

Narendra Modi
Sunil Tatkare Explanation : नाशिकमधील ‘त्या’ हॉटेलमध्ये जाण्याचे सुनील तटकरेंनी सांगितले कारण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com