Manoj Jarange News update Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange News : उपोषणकर्ते मनोज जरांगेंचा मोठा निर्णय ; आजपासून अन्नपाणी त्याग आंदोलन, ‎राज ठाकरे घेणार भेट

Jalna Maratha Andolan : आंदोलनाची धार तीव्र होण्याची शक्यता

Mangesh Mahale

Jalna : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या मराठा उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. सातव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. आजपासून त्यांनी अन्नपाणी त्याग आंदोलनास सुरवात केली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपले आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. (Latest Marathi News)

आज मराठा क्रांती मोर्च्याकडून जालना शहरात बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या मागणीच्या आंदोलनाची धार तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इम्तियाज जलील हेही घेणार जरांगेंची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज जालना दौऱ्यावर आहेत. "सरकारचं चुकलंच," अस म्हणत राज ठाकरेंनी राज्य सरकारवर टि्वट करीत ताशेरे ओढले होते. काल (रविवारी) मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी जरांगे यांच्यासोबत काल संवादही साधला होता. आज राज ठाकरे जालन्यात जाऊन आंदोलकांशी संवाद साधणार आहेत. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हेही आज अंतरवाली सराटीत भेट घेऊन आंदोलकांशी चर्चा करणार आहेत.

शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

जालना येथील लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अमरावतीच्या दर्यापूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने दर्यापूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. जयस्तंभ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळपासूनच शहरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT