Eknath Shinde News : मराठा आरक्षणाचा ज्यांनी गळा घोटला तेच गळा काढायला आले होते.. ; मुख्यमंत्र्यांचा अशोक चव्हाणांवर घणाघात

Maharashtra Politics : आमचा फेव्हिकॉलचा मजबूत जोड आहे. अजित पवार नाराज नाहीत," असे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सांगितले.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama

Jalna : "जालन्यातील घटना दुर्दैवी आहे. ही घटना कशामुळे झाली, हे शोधण्यासाठी काही लोक येऊन गेले. ज्या लोकांनी आरक्षणाचा गळा घोटला तेच याठिकाणी गळा काढायला आले होते," असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर घणाघात केला.

"अशोक चव्हाणजी, तुम्ही तर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होता, तुम्ही मराठा आरक्षणासाठी काय केले ? आरक्षणासाठी तुम्ही काहीही केले नाही, याचा मी साक्षीदार आहे," असा आरोप मुख्यमंत्री शिंदेंनी केला आहे. (Latest Marathi News)

Eknath Shinde
Tushar Doshi News : आंदोलकांना मारहाण करणं पोलीस अधीक्षकाच्या अंगलट ;गृहविभागाने पाठवलं सक्तीच्या रजेवर

बुलढाणा येथे 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर तुफान फटकेबाजी केली. "मी मुख्यमंत्री झाल्यापासून, मुख्यमंत्री बदलणार, अशी ओरड काही जण करीत आहेत. मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोन्याच्या चमचा घेऊन मी जन्माला आलो नाही, मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे. माझे मुख्यमंत्रीपद जाईल, असे सांगणारे ज्योतिषींही आता थकले आहेत,"

Eknath Shinde
Raj Thackeray News : 'मी आहे, काळजी करू नका..'; उपोषणकर्ते मनोज जरांगेंना राज ठाकरेंचा फोन

आमचा फेव्हिकॉलचा मजबूत जोड..

"अजित पवारही आता आमच्या सरकारमध्ये आले असून आमचं सरकार मजबूत सरकार आहे. आमच्यात नाराजी नाही. आमचा फेव्हिकॉलचा मजबूत जोड आहे. अजित पवार नाराज नाहीत," असे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नियोजित दौरा असल्याने ते या कार्यक्रमाला आले नाही, असे सांगण्यात आले. यावेळी मंत्री गिरीश महाजन, संजय राठोड, संजय गायकवाड, संजय रायामुलकर , खासदार प्रतापराव जाधव उपस्थित होते

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com