Jalna Mahanagarpalika New Sarkarnama
मराठवाडा

Jalna Municipal Corporation News : जालना महापालिकेत महापौर पदाचा पहिला मान स्त्री शक्तीला; 'या' आहेत रेसमध्ये..

Jalna mayor post women candidates : जालना महापालिकेत महापौर पदाचा पहिला मान महिलेला मिळण्याची शक्यता. जाणून घ्या कोणत्या महिला उमेदवार रेसमध्ये आहेत.

सरकारनामा ब्युरो

उमेश वाघमारे

Mayor News : जालना महापालिकेत पहिला महापौर होण्याचा मान हा महिलेला मिळाला आहे. आज निघालेल्या आरक्षण सोडतीमध्ये जालन्याचे महापौर पद हे अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. नगरपालिकेनंतर महापालिकेत रुपांतर झालेल्या पहिल्याच महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपने 41 नगरसेवक निवडून आणत बहुमतासह सत्ता मिळवली आहे. आता महापालिकेचा पहिल्या महिला महापौर कोण होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

भाजपकडून चार अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या महिला नगरसेवक निवडून आल्या आहेत. यात रिमा खरात, वंदना मगरे आणि श्रद्धा साळवे, रुपा कुरील यांचा समावेश आहे. पैकी तीन महिला नगरसवेक या माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांच्यासोबत आलेल्या होत्या. त्यामुळे या तिघींपैकी कोणाची महापौर पदावर वर्णी लागते का? की मग दानवे गटाच्या रुपा कुरील या बाजी मारतात? हे पहावे लागेल.

जालना महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यात कैलास गोरंट्याल यांची भूमिका महत्वाची ठरली होती. पक्षात प्रवेश केल्यापासूनच कैलास गोरंट्याल यांनी शिवसेनेसोबत युती नको, अशी भूमिका घेतली होती. शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेला ताटकळत ठेवून नंतर युती तोडण्याची रणनीती हा त्याचाच भाग होत्या, अशी चर्चा होती. महापालिकेत सत्ता आणल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कैलास गोरंट्याल यांचे फोन करून अभिनंदन केले होते.

कैलास भाऊ तुमच्या सांगण्यावरून युती तोडली आणि तुम्ही शब्द खरा करून दाखवला, अशी शाबासकीच मुख्यमंत्र्यांनी कैलास गोरंट्याल यांना दिली होती. एकूणच जालना महापालिकेतील भाजपच्या विजयावर गोरंट्याल यांचा प्रभाव दिसून आला होता. त्यामुळे पहिल्या महिला महापौर पदासाठी गोरंट्याल यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आणि निवडून आलेल्या नगरसेवकांची वर्णी लागण्याचीच अधिक शक्यता असल्याचे बोलले जाते.

महापालिकेत गोरंट्याल यांचा वरचष्मा..

महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय झाल्यानंतर भाजपचे नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, महानगरप्रमुख भास्कर दानवे यांच्या भूमिका महत्वाच्या होत्या. भास्कर दानवे, त्यांच्या पत्नी यांच्यासह कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी व मुलगा हे ही निवडून आले आहेत.

परंतु आरक्षण एससी महिलेसाठी राखीव झाल्याने गोरंट्याल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये आलेल्या चार महिला नगरसेवकांपैकी एकाची वर्णी लावण्याचा गोरंट्याल यांचा प्रयत्न असणार आहे. असे झाले तर नगरपालिकेप्रमाणेच महापालिकेतही कैलास गोरंट्याल यांचाच वरचष्मा राहिले असे दिसते.

जालना महानगरपालिका महापौर पदाचे आरक्षण सोडत अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे भाजपकडे असलेल्या चार महिला उमेदवारांची नावे सध्या चर्चेत असून यामध्ये माजी आमदार कैलास गोरंट्याल बाजी मारण्याची शक्यता आहे.

रिमा खरात (महिला) - कैलास गोरंट्याल

वंदना मगरे (महिला) -कैलास गोरंट्याल

श्रद्धा साळवे (महिला)- कैलास गोरंट्याल

दानवे गट

रूपा संजय कुरील (महिला)

महापौर आरक्षण - जालना, लातूरमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाचा महापौर.. महिला..

ओबीसी प्रवर्गासाठी आठ..

सर्वसाधारण प्रवर्ग : 17 छत्रपती संभाजीनगर महापालिका-सर्वसाधारण महिला आरक्षण

परभणी- खुला प्रवर्ग..महिला काँग्रेसचा आक्षेप.. या आधी दोनवेळा महिला आरक्षण होते..

नांदेड महापालिकेत- महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी महापौर पद..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT