Manoj Jarange Patil-Devendra Fadnavis Sarkarnama
मराठवाडा

Fadnavis On Jarange Patil : जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा; देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Vijaykumar Dudhale

Mumbai : मराठा आरक्षण उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. शेवटी जीव हा अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे त्यांच्या सोबतच्या लोकांनीही त्यांची थोडी काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (Jarange Patil should trust the Chief Minister; Devendra Fadnavis' appeal)

अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना बोलतानाही त्रास होता. त्यांचा आवाजही येत नव्हता. असे असूनही जरांगे हे वैद्यकीय उपचारसाठी तयारी नाहीत. त्याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीबाबत काळजी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. अंतरवाली सराटीत डॉक्टरांची टीमही तैनात आहे. शेवटी जीव हा अत्यंत महत्वाचा आहे, त्यामुळे जरांगे पाटील यांच्या सोबतचे जे लोक आहेत, त्यांनीही थोडी त्यांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

फडणवीस यांनी नमूद केले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या मराठा आरक्षणाच्या विषयात लक्ष घालून आहेत. जो काही योग्य निर्णय आहे, तो झाला पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून आमचा सर्वांचा प्रयत्न चाललेला आहे, त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला पाहिजे.

केरळमध्ये स्फोट; महाराष्ट्रात अलर्ट

केरळमधील एका चर्चमध्ये एकापाठोपाठ काही स्फोट झाले आहेत. त्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्रात विशेष अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्याबाबतही फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले की, आपण नेहमीच अलर्टवर असतो. दुसरा कोणताही वेगळा अलर्ट आपण दिलेला नाही. केरळमधील घटनेवर लक्ष ठेवून आहोत. त्याबाबतची माहिती आपल्यापर्यंत निश्चितपणे पोचेल. पण, मुंबई आणि पुण्यासारखी महत्वाची शहरं आपल्याकडे असल्यामुळे या दोन्ही ठिकाणी आपण लक्ष ठेवून असतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT