solapur : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबरोबर आम्ही सर्वजण मराठी समाजातील लोक आहोत. ज्या ज्या वेळी मराठी समाजाची आंदोलने झाली. लाखोंचे मोर्चे निघाले. तेव्हापासून आम्ही कायम मराठा समाजाबरोबर होतो, आहे आणि उद्याही राहू. समाजातील एक घटक, लोकप्रतिनिधी म्हणूनही सोबत राहू. शेवटी मी एकच सांगतो, माझ्याकडून झालेल्या विधानामुळे मराठा समाज बांधवांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी स्पष्ट केले. (Public apology of NCP MLA Babanrao Shinde)
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाच्या कार्यक्रमात ‘तुम्ही एकट्यानेच समाजाचा ठेका घेतलाय का’ एवढेच आमदार बबनराव शिंदे यांचे विधान समाज माध्यमांतून व्हायरल झाले होते. ते मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून म्हटल्याचे व्हिडिओबरोबर सांगण्यात येत होते. मी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत बोललो नसून आमच्या काही कार्यकर्त्यांसाठी वापरल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. आमदार शिंदे यांनी सोलापुरात सुरू झालेल्या साखळी उपोषणाला पाठिंबा देत आपल्या विधानाबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बबनराव शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला माझा संपूर्णपणे पाठिंबा आहे. माझ्या एका वाक्याचा प्रसार माध्यमांतून जाे विपर्यास झाला. साखर कारखान्याच्या सभेच्या वेळी आम्ही तो ‘एका’ हा शब्द आमच्या काही उद्धट कार्यकर्त्यांसाठी वापरला होता. त्याचा संबंध मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी काही लोकांनी जाणीवपूर्वक लावला. वास्तविक पाहता जरांगे पाटील यांच्या उपोषणाला माझा पूर्वीपासूनच पाठिंबा आहे. अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांवर जो लाठीहल्ला झाला, त्याचाही मी जाहीरपणे निषेध केला.
जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या बरोबर आम्ही सर्वजण मराठी समजातील लोक आहोत. ज्या ज्या वेळी मराठी समाजाची आंदोलने झाली. लाखोंचे मोर्चे निघाले. तेव्हापासून आम्ही कायम मराठा समाजाबरोबर होतो, आहे आणि उद्याही राहू. समाजातील एक घटक, लोकप्रतिनिधी म्हणून मी कायम समाजासोबत कार्यरत असणार आहे. शेवटी मी एकच सांगतो, माझ्याकडून झालेल्या वक्तृत्वामुळे मराठा समाज बांधवांच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, असेही त्यांनी सांगितले.
एक दिवसाचे विशेष अधिवेशन घ्या : बबनराव शिंदे
दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे. त्यात मराठा समाजाला कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र आमदार बबनराव शिंदे यांनी सरकारला पाठविले आहे. त्याचीही त्यांनी आठवण करून दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.