Maratha Aggressive : कोल्हापुरात खासदार मंडलिक, आमदार पाटील यांच्या गाडीसमोर झोपले मराठा आंदोलक

Maratha Reservation : आमदार, खासदार यांच्या गाडीच्या आडवे पडून रस्त्यावर झोपून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या.
Maratha Reservation : Sanjay Mandlik-Rajesh Patil
Maratha Reservation : Sanjay Mandlik-Rajesh PatilSarkarnama
Published on
Updated on

kolhapur News : मराठा समाजाकडून राज्यभरात आंदोलन, उपोषणे केली जात असून कोल्हापुरातही ठिकठिकाणी मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहेत. जलजीवनच्या कामाच्या उद्‌घाटनासाठी आलेले खासदार संजय मंडलिक आणि आमदार राजेश पाटील यांच्या गाडीसमोरच मराठा आंदोलक झोपले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची धांदल उडाली. आजरा तालुक्यातील वाटंगी गावात हा प्रकार घडला. (Maratha protesters slept in front of MP Mandlik-mla Patil's car)

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात वाटंगी गावात रविवारी (ता. २९ ऑक्टोबर) जलजीवन कामाचे उद्‌घाटन खासदार संजय मंडलिक आणि आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थित पार पडणार होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघेही गावात आल्यानंतर मराठा समाज बांधवांनी नेत्यांना गावात बंदी असल्याचे सांगत त्यांच्या गाडीसमोरच लोटांगण घातले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Maratha Reservation : Sanjay Mandlik-Rajesh Patil
Solapur News : राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षांना मराठा आंदोलकांनी सुनावले; ‘...तरच आंदोलनात सहभागी व्हा’

आमदार, खासदार यांच्या गाडीच्या आडवे पडून रस्त्यावर झोपून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. कोणत्याही परिस्थितीत आमदार, खासदारांनी कार्यक्रमाला जाऊ नये, अशी भूमिका घेत आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. त्यानंतर खासदार संजय मंडलिक यांनी गाडीतून उतरून आंदोलनकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या. या वेळी आंदोलकांनी खासदारांना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध नोंदवला.

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नजरकैदेत ठेवले

अतिशय गुप्तता पाळून शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. कणेरी मठ येथे जात असताना सकल मराठा समाजाच्या बांधवांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी आधीच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना राजारामपुरी पोलिस ठाण्यात नजरकैदेत ठेवले होते

Maratha Reservation : Sanjay Mandlik-Rajesh Patil
Maratha Reservation : सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण हाणून पाडणाऱ्यांचा धनी कोण? आमदार कानडेंचा फडणवीसांवर निशाणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com