Rajesh Tope on Jayakwadi Water Issue News : जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणातून ठरलेल्या नियमानुसार तातडीने मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडण्यात यावे, यासाठी आपण लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांनी केले.
तसेच, मराठवाडा पाणीप्रश्नांवर मराठवाड्यातील सर्व आमदारांनी एकत्र येऊन प्रश्न सोडविणे अत्यंत गरजेचे आहे, यासाठी आपण आग्रही भूमिका घ्यायला तयार असल्याचे या वेळी टोपे यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जालन्यात प्रसारमाध्यमांशी ते बोलताना राजेश टोपे म्हणाले, ''जायकवाडी कालवा सल्लागार समिती बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी दोन आवर्तने सोडण्यात येणार आहेत. पाण्याचे पहिले आवर्तन शुक्रवारी सुरू करण्यात आले.''
तसेच, ''एकूण 25 दिवस पाणी सोडण्यात येणार आहे.100 क्युसेसप्रमाणे पाणी सोडण्यात आले असून, टप्प्याटप्प्याने यात वाढ केली जाणार आहे, तर दुसरे आवर्तन 20 जानेवारी 2024 रोजी एकूण 25 दिवसांचे असणार आहे. या पाण्याचा औरंगाबाद, जालना व परभणी या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पाण्याचा फायदा होणार आहे,'' असंही टोपेंनी सांगितले.
याशिवाय ''अंबड, घनसावंगी व परतूर तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पिण्याच्या पाण्याची परिस्थिती लक्षात घेता जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे गोदावरी नदीवरील बॅरेजेसमध्ये व शेतीसाठी पाणी सोडणेबाबत वारंवार पाठपुरावा करीत आहे.''
तर ''डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा औरंगाबाद, जालना व परभणी जिल्ह्यांतील नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे,'' असंही टोपे म्हणाले.
याचबरोबर ''सध्या शेतकरी रब्बी हंगामातील गहू, बाजरी, ज्वारी, तूर, हरभरा, मका, ऊस आदी पिकांसह फळबागांना पाणी देण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कायद्यानुसार 15 ऑक्टोबरमध्ये जी जायकवाडी धरणाची स्थिती असते. त्या स्थितीनुसार वरच्या धरणातून पाणी सोडण्याची तरतूद आहे. त्यानुसार पाणी सोडण्यात यावे, जायकवाडी धरणाच्या वरील सर्व धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे.'' अशी माहितीही यावेळी टोपेंनी दिली.
तसेच ''मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार 15 ऑक्टोबरपर्यंत जायकवाडी धरणात ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समूहांमधून पाणी सोडावे लागते. त्यादृष्टीने पाटबंधारे विकास महामंडळाने निर्णय घेत येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत एकूण 8.603 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. परंतु अद्याप पाणी सोडण्यात आलेले नाही.'' अशा शब्दांत राजेश टोपे यांनी जायकवाडी पाणी प्रश्नावर मत मांडलं.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.