Tanpure Vs Kardile : ''100 कोटी थकवलेल्यांनी बोलू नये''; कर्डिलेंचा तनपुरेंवर पलटवार!

Shivaji Kardile and Prajakt Tanpure News : ''चुकीच्या गोष्टी केल्यात म्हणून तुम्ही अडचणीत आलात", असंही कर्डिले म्हणाले आहेत.
 Kardile and Tanpure
Kardile and Tanpure Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar District Bank News :आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हा सहकारी बँकेतील हुकूमशाही आणि उधळपट्टी कारभारावर केलेल्या आरोपाचा माजी आमदार तथा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी समाचार घेतला.

'जिल्हा सहकारी बँकेचे 100 कोटी रुपये थकवणाऱ्यांना आरोप करण्याचा कोणताही नैतिक अधिकारी नाही', असा टोला शिवाजी कर्डिले यांनी आमदार तनपुरे यांना लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 Kardile and Tanpure
Radhakrishna Vikhe Patil: मंत्री विखेंनी आश्वासन न पाळल्याने नागरिक संतप्त; जलसंपदा कार्यालयाला ठोकले टाळे

पाथर्डी तालुक्यातील श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या उपस्थित झाला. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अप्पासाहेब राजळे, आमदार मोनिका राजळे, राहुल राजळे, माजी नगराध्यक्ष डॉ. अभय आव्हाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, माणिक खेडकर, बापूसाहेब भोसले, विष्णूपंत अकोलकर, सुभाष बर्डे, कुंडलिक आव्हाड, अशोक चोरमले, संतोष दहिफळे, सुनील ओव्हळ, काशीबाई गोल्हार, आशा गरड, मंगल कोकाटे उपस्थित होते. यशवंत व सौ. गवळी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

या वेळी कर्डिले म्हणाले, "जे बँकेचे पैसे बुडवून बसले आहेत. आता तेच चौकशी आणि माहिती घेत आहेत. अगोदर तुमची चौकशी करा, मग आमची. आम्ही कुठल्याही प्रकारचा चुकीचा कारभार केलेला नाही. तुम्ही चुकीच्या गोष्टी केल्यात म्हणून अडचणीत आलात". बँकेचे १०० कोटी रुपये थकवणाऱ्यांना बँकेच्या कारभारावर आरोप करण्याचा अधिकार नाही. जे बँकेचे नियमित पैसे भरतात तेच बँकेविषयी अधिकाराने बोलू शकतात,'' असेही कर्डिले म्हणाले.

 Kardile and Tanpure
Maratha Reservation : ''राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू'', मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती!

याशिवाय आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले, की ''जिल्हा बँकेच्या मदतीमुळे कारखाना व इथेनॉल प्रकल्प सुरू होत आहे. अमित शाह हे देशाचे पहिले केंद्रीय सहकारमंत्री यांनी अडचणीत असणाऱ्या कारखान्यांना मदत देण्याचे धोरण स्वीकारले आहे. परिणामी दुष्काळी भागात असलेला वृद्धेश्वर सहकारी कारखाना स्पर्धेत कायम आहे.'' तसेच या वेळी कामगारांना १३ टक्के बोनस देणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले.

 Kardile and Tanpure
Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंचा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर मोठा आरोप, म्हणाले...

मोनिका राजळेंमुळे बँकेच्या अध्यक्षपदी -

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी चांगली रस्सीखेच होती. आमदार मोनिका राजळे यांना संधी होती, परंतु मला बँकेचा चेअरमन करण्यामध्ये आमदार मोनिका राजळे यांचा मोठा वाटा आहे. नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना मदत करण्याच्या दृष्टीने नेहमीच कार्यरत राहील,'' असे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी या वेळी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com