Jayakwadi Water Issue Sarkarnama
मराठवाडा

Jayakwadi Water Issue : जायकवाडी पाणीप्रश्न पेटला ? सर्वपक्षीय नेत्यांच्या आंदोलनावेळी कार्यकर्त्यांची धरपकड

Ganesh Thombare

Chhatrapati Sambhajinagar News : जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणातून पाणी सोडण्यासाठी सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरले आहेत. जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हे आंदोलन करण्यात आले आहे.

या वेळी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली. तसेच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला. मात्र, नंतर पोलिसांनी यातील काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर दुसरीकडे जायकवाडीला पाणी देण्यास नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील नेत्यांसह नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आता जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. या वर्षी अनेक जिह्यांत अपेक्षित तेवढा पाऊस झालेला नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती आहे, तर अनेक गावांत पिण्यासाठी पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आलेला आहे.

यातच जायकवाडीला नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणातून पाणी सोडण्याची मागणी होत आहे, पण या मागणीला नगर-नाशिकमधील सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध केला आहे, तर पाणी सोडण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे आता जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून राजकारण तापलं आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील सर्वपक्षीय आंदोलनामध्ये माजी मंत्र्यांसह आजी-माजी आमदारांचाही सहभाग होता. त्यामुळे सध्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता आहे, पण यावर आता राज्य सरकार काय निर्णय घेतं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Edited by Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT